गडचिरोली : भरवस्तीत शिरलेल्या जखमी वाघिणीला अखेर पाच तासांनी जेरबंद करण्यात यश

संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. पकडण्यात आलेल्या वाघिणीच्या गळ्याजवळ जखम आढळून आली.

tigress entered nursery college gadchirol
भरवस्तीत शिरलेल्या जखमी वाघिणीला अखेर पाच तासांनी जेरबंद करण्यात यश (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

गडचिरोली : शहरातील कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत शिरलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात विशेष पथकाला अखेर यश आले. सकाळी ११ वाजता वाघीण दिसून आल्यानंतर डॉ. खोब्रागडे यांची चमू वाघिणीला पकडण्यासाठी परिश्रम घेत होती. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. पकडण्यात आलेल्या वाघिणीच्या गळ्याजवळ जखम आढळून आली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – सी-२० गटामुळे जी-२० समुहाचा सामाजिक संदर्भ विस्तारण्यास मदत, कार्यकारी समितीची बैठक उत्साहात

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट्याने घेतला ५३ माणसांचा बळी; खुद्द वनमंत्र्यांचीच कबुली

जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली असून वन्यजीव व मानव संघर्षदेखील मधल्या काळात वाढले. त्यामुळे जंगलातील वाघ महामार्गालगत दिसून येतात. सोमवारी तर एक वाघीण चक्क शहराच्या मध्यभागी असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत शिरल्याने चांगलीच तारांबळ उडाली. सुरवातीला दोन वाघ असल्याचे बोलल्या जात होते. मात्र, एक वाघीण होती. ती सुद्धा जखमी झाल्याने आश्रय शोधत शहरात आल्याचे सांगितल्या जात आहे. सहा तासांच्या परिश्रमानंतर डॉ. खोब्रागडे यांच्या चमूला वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. वाघिणीची माहिती मिळताच सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके यांनी सकाळपासून वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पाळत ठेवली होती.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:09 IST
Next Story
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट्याने घेतला ५३ माणसांचा बळी; खुद्द वनमंत्र्यांचीच कबुली
Exit mobile version