बुलढाणा : वर्षानुवर्षे लढा देऊनही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सुरु असलेल्या धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील एका समाज बांधवाने आज, रविवारी उत्तररात्री ‘मोबाईल टॉवर’ वर चढून ठिय्या मांडला.

मागण्यांची पूर्तता न झाल्यास टॉवर वरून थेट खाली उडी मारण्याच्या इशारा आंदोलनकर्त्याने दिला. यामुळे पोलीस विभागासह प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यामुळे तारांबळ उडालेले अधिकारी- कर्मचारी या ‘हवेत’ सुरू असलेल्या आंदोलन स्थळाकडे रवाना झाले.

Uddhav Thackeray VS CJI DY Chandrachud
Uddhav Thackeray : “अन्यथा सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली असती”, ‘त्या’ भेटीवरून उद्धव ठाकरेंचा चिमटा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Eid Miladunnabi utsav Committee Buldhana organized blood donation camp
बुलढाणा : संकलन साहित्य संपले, पण रक्तदात्यांची रांग कायम!
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
states all primary schools closed on September 25
राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद

हे ही वाचा… ‘हे गणराया..’ यांना सदबुद्धी दे .. ,नागपुरात या फलकाची चर्चा

गजानन माधव बोरकर असे टॉवर आंदोलन करणाऱ्या धनगर समाज कार्यकर्त्याचे नाव असून ते मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील रहिवासी आहेत. मागील काळात धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी बोरकर यांनी सातत्याने विविध आंदोलने केली आहे.चालू वर्षात त्यांनी मेहकर येथे दीर्घ आंदोलन करून या मागणीकडे लक्ष वेधले होते.

पंढरपूर (जि. सोलापूर) येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये विजय गायके, दीपक बोहर्हाडे,योगेश गणेश माऊली मेहकरणवार आदींचा समावेश आहे. आरक्षणाच्या मागणीवरून जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांत जागृती व्हावी आणि आरक्षण संदर्भात पंढरपूर येथे सुरु असलेल्या धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गजानन बोरकर
(शेलगाव देशमुख) यांनी हे अभिनव आंदोलन केले.

हे ही वाचा…राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद

किर्रर्र अंधारात चढाई

प्राप्त माहितीनुसार, रविवारी १५ सप्टेंबर रोजी उत्तररात्री साडेतीन वाजता किर्रर्र अंधारात गजानन बोरकर यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील शेलगाव देशमुख येथील भारत दूर संचार निगमच्या मोबाईल टॉवर वर चढाई केली. मोबाईलच्या वरच्या भागात त्यांनी ठिय्या मांडला. याची माहिती धनगर समाज बांधवांना आणि काही मोजक्या गावकऱ्यांना होताच ते अंधारात आंदोलन स्थळ असलेल्या टॉवर परिसर मध्ये दाखल झाले. ही खबर वाऱ्यासारखी पसरल्यावर पंचक्रोशीतील समाज बांधव, गावकरी, आणि युवक यांची चांगलीच गर्दी जमली. मार्गावरून जाणाऱ्यांनी वाहने थांबवून आंदोलन याची देही याची डोळा पाहिले. दरम्यान टॉवर आंदोलनाची माहिती मिळताच वरिष्ठांना अहवाल देत पोलीस विभाग आणि मेहकर तालुका प्रशासनाचे पथक शेलगाव देशमुख परिसररात दाखल झाले. यामुळे डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे, मेहकर तहसिल कार्यलयाचे नायब तहसीलदार अजय पिंपरकर आणि पोलीस, महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

हे ही वाचा…पोलिसांसोबत वनविभागही गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी रस्त्यावर

घटनास्थळी तणाव

धनगर समाजाचे जिल्ह्यातील आक्रमक नेते अशी ओळख असलेले गजानन बोरकर यांनी मागण्यांची तड लागेपर्यंत टॉवर आंदोलन सुरूच निर्धार व्यक्त केला. तसेच वरून खाली उडी मारण्याचा इशारा दिला. यामुळे घटनास्थळी काहीसा तणाव निर्माण झाला. मात्र, ठाणेदार अमरनाथ नागरे आणि नायब तहसीलदार अजय पिंपरकर या अधिकाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळत बोरकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनवणी केली. आपल्या मागण्या वरिष्ठांकडे आणि शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन देत मनधरणी केली. यामुळे अखेर तब्बल दहा तासानंतर बोरकर हे टॉवर वरून खाली उतरले. यामुळे पोलीस, महसूल यंत्रणा सह प्रशासनाने अक्षरशः सुटकेचा श्वास सोडला.

हे ही वाचा… नागपूर : आज, उद्या पावसाचा अंदाज, अनंत चतुर्दशीला मात्र…

‘उपेक्षा किती दिवस’?

आंदोलनाची सांगता झाल्यावर बोरकर यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा अतिशय गरीब असून मेंढपाळ व्यवसाय करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गा मध्ये आरक्षण देण्यात आले आहे मात्र,सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यकर्ते ही उपेक्षा आणखी किती दिवस करणार? असा सवाल त्यांनी केला. दीर्घकाळ पासून अंमलबजावणी होत नाही धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकशाही मार्गाने व शांततेने अनेक वर्षापासून आंदोलन निवेदन व मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार गंभीरतेने घेत नाही.यापरिनामी धनगर समाज बांधवांची मुले मुली विविध योजनेपासून वंचित राहत आहे. त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मागासलेपण कायम असल्याची खंत बोरकर यांनी या अनौपचारिक चर्चेअंती बोलून दाखविली.