अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह मंगळवारी अकोल्यात दाखल होत आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी स्वागताचे फलक फाटलेल्या अवस्थेत आढळून आले. ते फलक वाऱ्यामुळे फाटले की कोणी फाडले यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह अकोल्यात येत आहेत.
पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, २० आमदार उपस्थित राहतील. दरम्यान, अमित शाह यांचे आगमन होण्यापूर्वीच शहरात लावलेले त्यांच्या स्वागताचे फलक फाटलेल्या स्थितीत दिसून आले. बाळापूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये ते आढावा बैठक घेणार असून दु