scorecardresearch

नांदुरा अपघातातील मृतांची संख्या ५, झारखंडमधील मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूर – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे.

total 5 death in Nandura accident
रस्त्याच्या बाजूला खाली जमिनीवर मजूर झोपलेले असताना ट्रक क्र. पिबी-११/ सिझेड४०७४ च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांना चिरडले. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

बुलढाणा : नागपूर – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे.

mahabaleshwar panchgani kaas plateau in satara house full with tourist due to consecutive holidays
सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी कास पठार हाऊसफुल्ल
huge rush of tourists in lonavala
सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
police operation on National Highway buldhan
बुलढाणा: राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई; ७० लाखांचा गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त
shiva bhakta killed in truck accident
राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर २८६ अपघातप्रवण ठिकाणे; तीन वर्षांत २४०१ अपघातांमध्ये १६०६ जणांचा मृत्यू

एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडल्याने ही भीषण दुर्घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आज सोमवारी सकाळी ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला खाली जमिनीवर मजूर झोपलेले असताना ट्रक क्र. पिबी-११/ सिझेड४०७४ च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांना चिरडले. यातील मृतांची संख्या ५ झाली असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरु आहेत.

आणखी वाचा-“नरेंद्र मोदींच्या संकल्पपूर्तीसाठी महात्मा गांधींनी आशीर्वाद द्यावा,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागणे…

प्रकाश मकु घांडेकर, (२६), पंकज तुळशिराम जांबेकर (१९), अभिषेक रमेश जांबेकर (१८ ), राजाराम बुडा जांभेकर (३०) सर्व रा. मोरगड, ता. चिखलदरा जि.अमरावती आणि गुणीराम भोगाराम (३५, रा. मतवली ता. जि. पलामू, झारखंड) अशी मृतांची नावे आहेत, तर अक्षय कुमार सी कुमार राम (१८), सतपाल कुमार मानसिंगराम (२२), मेहसराम रवी (६५), आशिष कुमार राम (१८) सर्व रा. मतवली, ता. जि. पलामू, झारखंड आणि दीपक पंजी बेलसरे (२३, रा. मोरगड, ता. चिखलदरा, जि. अमरावती) यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Total 5 death in nandura accident jharkhand laborer dies during treatment scm 61 mrj

First published on: 02-10-2023 at 14:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×