वर्धा : भारतात दोन वेळा पर्यटन दिन साजरा केल्या जात असतो. आज म्हणजे २५ जानेवारीस राष्ट्रीय तर २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा होतो. १९४८ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली. भारत विपुल नैसर्गिक संपत्तीने समृद्ध देश समजल्या जातो. तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळे पण मोठ्या प्रमाणात आहेतच. जगभरातील देशांना भारताच्या पर्यटन समृद्धीची ओळख करून देण्यासाठी आजचा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून देशभर साजरा केल्या जातो. पर्यटनस चालना देत देशाचा रोजगार आणि जिडीपी वाढविण्याचा उद्देश असतोच. १९९८ साली केंद्र पर्यटन खात्याच्या पातळीवार खास पर्यटन विभाग स्थापन करीत प्रोत्साहन देणे सूरू झाले.

अलीकडे बोर हा व्याघ्र प्रकल्पच नव्हे तर जिल्ह्यातील अन्य वाघ चांगलेच चर्चेत आले आहे. बोरचे वाघ पर्यटकांना आनंद देतात तर समुद्रपूरचे वाघ गावाकऱ्यांना जगणे नकोसे करून सोडत आहे. एकच वेळी पाच वाघ पकडण्याचे आदेश दिल्या जाण्याची घडामोड म्हणूनच जिल्ह्यास चर्चेत आणणारी ठरते. बोर प्रकल्प देशातील सर्वात छोटा व विमानतळपासून सर्वात जवळचा अशी ओळख ठेवून आहे. भरपूर जैव वैविद्य असलेला हा असा एकमेव समजल्या जातो. म्हणजे पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, फुलपाखरे व अन्य प्रजाती मोठ्या प्रमाणात ईथे आश्रयास आहेत. या बोरची महाराणी म्हणून कॅटरीना वाघीण आब राखून आहे. तिचे दर्शन झाले की पावले, अशी पर्यटकांची भावना असते.

आज पर्यटन दिनीच तिने पहाटे फेर फटका मारण्यास सुरवात केली. मात्र नेहमी तिच्या प्रतीक्षेत असलेले पर्यटक तिला दिसले नाही. प्रसिद्ध गाईड शुभम पाटील सांगतात की रविवार असल्याने आज पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येत आले आहे. सरासरी २०० ते ३०० पर्यटक रोज येतात. अलीकडे कॅटरीना व तिचे दोन बछडे हमखास दिसायला लागले आहेत. त्यामुळे पर्यटक ओढा वाढू लागत आहे. कॅटरीना हे मुख्य आकर्षण असल्याचे पाटील सांगतात.

वाढत्या गर्दीमुळे केवळ बोर सेलू गेटवर अवलंबून न राहता आणखी गेट सूरू करण्याचा विचार झाला. त्यामुळे १५ दिवसापूर्वी ढगा व राहाती हे सफारी गेट सूरू करण्यात आले. मात्र अद्याप तिथे वाहने पोहचली नाहीत. तसेच नागपूरमार्गे येणे सोयीचे व्हावे म्हणून नवेगाव गेट तयार असून उद्घाटन प्रतीक्षेत आहे. ते तीनही बफर क्षेत्रात नेतात. येथील जंगल अद्याप पर्यटकांपासून दूरच आहे. मात्र पर्यटन दिनाचा हेतू सफल व्हावा, यात बोर व्याघ्र प्रकल्प आघाडीवर राहील, असा विश्वास पाटील व्यक्त करतात.