अमरावती : चिखलदरा आणि परिसरातील शेतकरी आजवर संपूर्णपणे पारंपरिक पिके घेऊनच उदरनिर्वाह करीत असत. मात्र बदलत्या काळानुसार या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता परिस्थिती अशी झाली आहे की, चिखलदरा पर्यटन क्षेत्रात येणारे देशभरातील नागरिक येथे स्ट्रॉबेरीचा आस्वाद नक्कीच घेताहेत. चिखलदऱ्यात पिकवलेली स्ट्रॉबेरी नागपूरमार्गे राज्यासह देशभरातील इतर जिल्ह्यांमध्ये पोहोचू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून चिखलदरा परिसरातील मोथा या गावातील काही शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करीत आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : चवताळलेल्या वाघाने युवकावर दोनदा झडप घेतली

houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

स्‍ट्रॉबेरी शेतीशी संबंधित असलेले गजानन पाटील, साधुराम पाटील म्हणाले की, इतर पिकांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी ही पूर्णपणे नगदीवर आधारित असून बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना खरेदीदाराकडे जावे लागत नाही. स्ट्रॉबेरी वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी कटिंग्ज १२ रुपये दराने मागवल्या जातात. एका एकरात सुमारे २२ हजार कलमे आवश्यक आहेत. थंडीत कमी पाण्यातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले होते. एका एकरात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. ४५ दिवसांनी फळ उत्पादन सुरू होते. जानेवारी ते मार्च या कालावधीत पिके घेतली जातात. एक एकर शेतीतून दररोज ३० ते ४० किलो स्ट्रॉबेरी मिळते. लागवडीसाठी तीन लाख रुपये खर्च होऊनही शेतकऱ्यांना एकरी तीन लाख रुपयांचा नफा मिळतो. एक एकर शेतीतून सुमारे ८ जणांना रोजगारही मिळतो. चिखलदरा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या या स्ट्रॉबेरीची किंमत सुमारे २५० ते २८० रुपये प्रतिकिलो आहे. बहुतेक स्ट्रॉबेरी पर्यटक खरेदी करतात. चिखलदऱ्यात ठिकठिकाणी स्टॉल लावून स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे.