महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महापालिकेकडून प्रशिक्षण

ऑनलाईन सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती  दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

महिला व बालकल्याण समितीचा निर्णय

नागपूर : करोनाच्या काळात अनेक महिलांचा रोजगार गेला असताना आता महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महापालिकेतर्फे त्यांना शिवणकाम, कुकिंग, ब्युटीशियन, मेहंदी क्लासेस, रांगोळीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी विविध झोन पातळीवर कार्यशाळा घेण्यात येईल. महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभेत बुधवारी घेण्यात आला.

ऑनलाईन सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती  दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महिलांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे. जर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले तर त्याचा लाभ त्यांच्या कुटुंबाला होईल. प्रत्येक प्रभागात महिलांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल. नवीन आर्थिक वर्षांत महिलांना शिवणयंत्रसुद्धा देण्यात येईल. समितीतर्फे प्रत्येक झोनमध्ये बचत गटाचा महिलांसाठी पोटोबा (कॅन्टीन) ची जागा उपलब्ध करण्याचे निर्देश समाज विकास विभागाला देण्यात आले. दिव्यांगांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळामध्ये दुरुस्ती करण्याचेही निर्देश दिले. अर्थसहाय्य योजनेत ज्या दिव्यांगांचे स्वत:चे घर नाही त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे स्वत:चे घर असावे ही अट शिथिल करून नागपूरचा रहिवासी असावा, अशी अट टाकण्याचे निर्देश यावेळी  दिले. महापालिकेच्या मुख्यालयात महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Training municipal corporation make women self reliant ssh

Next Story
‘तो’ पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीतच