scorecardresearch

चंद्रपूर : ३७ मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स उलटली; २ मजूर ठार, १८ जखमी

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून तेलंगणाच्या हैद्राबाद येथे ३७ मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे उलटली.

travels accident
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून तेलंगणाच्या हैद्राबाद येथे ३७ मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे उलटली. या अपघातात २ मजुरांचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशनजवळ छत्तीसगड राज्यातून बेमेत्रा जिल्ह्यातील तालुका नावागळ येथून हैदराबादला मजूर घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पहाटे २.३० वाजताच्यादरम्यान विरूर ते धानोरादरम्यान उलटली.

ट्रॅव्हल्स खाली दबून रात्रीच एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत असताना मृत पावला. एकूण ३७ मजूर प्रवाशांपैकी १८ जखमी आहेत. त्यापैकी काहींना उपजिल्हा रुग्णालय राजूरा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रायपूर येथील कंपनीची असून अवैधरित्या मजुरांची ने-आण करीत असल्याचे कळते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:21 IST