समाज बांधव, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांची हजेरी

नागपूर : गोवारी समाजाला आदिवासी दर्जा व जातप्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीसाठी गोवारी बांधवांनी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. यावेळी चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. या घटनेला २७ वर्षे झाली. त्यानिमित्त टी पॉईंट चौकातील गोवारी स्मारकावर विविध राजकीय पक्षातील प्रतिनिधींसह गोवारी बांधवांनी  श्रद्धांजली अर्पण केली. 

High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?
prakash ambedkar
‘वंचित’ स्वंतंत्र लढणार! लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नागपूरमध्ये ‘या’ उमेदवाराला पाठिंबा
Sudhir Mungantiwar
मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

गेल्यावर्षी करोनामुळे गोवारी स्मृतिदिनी केवळ श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आचारसंहिता आणि करोनामुळे सार्वजानिक कार्यक्रमाला परवानगी नसल्यामुळे कुठलीही श्रद्धांजली सभा न होता विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील गोवारी बांधवांनी स्मृतीस्थळी येऊन आंदराजली वाहिली. स्मारक समितीचे कैलाश राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी सकाळी स्मारकाजवळ ज्योत प्रज्वलित केली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी  पुष्पचक्र वाहत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर आमदार परिणय फुके, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, आमदार विकास कुंभारे, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार प्रकाश गजभिये, धर्मपाल मेश्राम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, परिणिता फुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे आदींनी  श्रद्धांजली अर्पण केली.

वंचित बहुजन आघाडीतर्फे  संविधान चौक ते शहीद आदिवासी गोवारी स्मारकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पूर्व विदर्भ मुख्य संयोजक व माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल  मेश्राम, राजू लोखंडे, शहर अध्यक्ष रवी  शेंडे, जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर, आदिवासी नेता भगवान भोंडे, अरविंद सांदेकर, अंकुश मोहिले आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बहुजन समाज पक्षाच्या वतीने प्रदेश सचिव रंजना ढोरे, उत्तम शेवडे, संदीप मेश्राम, राजीव भांगे व पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी शहीद गोवारी स्मारकास अभिवादन केले. यावेळी  टी पॉईंट चौकाकडून गोवारी स्माकराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.