scorecardresearch

नागपूर : ट्रकची दुचाकीला भीषण धडक; १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू, आई व मावशी जखमी

बहीण आणि बाळासह देवदर्शनासाठी जात असताना महिलेच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू झाला.

truck hit bike
नागपूर : ट्रकची दुचाकीला भीषण धडक; १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू, आई व मावशी जखमी (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : बहीण आणि बाळासह देवदर्शनासाठी जात असताना महिलेच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू झाला. दोन्ही महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथर्व असे मृत बाळाचे नाव आहे तर आई संध्या आशीष बारमाटे (२५, रा. घाटरोहणा, गोंडेगाव-पारशिवनी) आणि दीपाली प्रकाश पाटील (२४, रा. खापरी रेल्वे कॉर्टर, खापरी) अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.

हेही वाचा – नर्मदेच्या पुरात नागपूरच्या डॉक्टरसह पाचजण अडकले, नितीन गडकरींनी केली मदत

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
World Cup 2023 Updates
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

हेही वाचा – गणरायाच्या आगमनासह कोसळणार पावसाच्या सरी

संध्या बारमाटे यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिला १४ महिन्यांच्या बाळासह टाकळघाटला देवदर्शनाला जायचे होते. संध्याची विवाहित बहीण दीपाली पाटील ही खापरीमध्ये राहते. त्यामुळे संध्या ही पती आशीष व मुलगा अथर्वसह दुचाकीने दीपालीच्या घरी गेले. शनिवारी सायंकाळी टाकळघाटला जाण्यासाठी संध्या ही बहीण आणि बाळासह दुचाकीने जात होत्या, तर आशीष बारमाटे आणि प्रकाश पाटील हे बसने टाकळघाटला गेले. जामठ्यापासून जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात बाळाचा मृत्यू झाला तर संध्या आणि दीपाली गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच ट्रकचालकाने पळ काढला. काही वेळात हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Truck hit bike death of a baby mother and aunt injured adk 83 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×