नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफ. डी. ए.) आयुक्त होताच तुकाराम मुंढे यांनी राज्याभरात प्रतिबंधित तंबाखू, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विरोधात कारवाई सुरू केली आहे.
एका कारवाई दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिला अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्यावर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी तत्काळ दोषींवर कठोर कारवाईचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या पाठोपाठ मंत्रीही तंबाखू तस्कर विरोधात ॲक्शन मोडवर आले आहे. मंत्र्यांनी नागपूर सह राज्यभरातील अधिकाऱ्यांना प्रत्येक कारवाईत आम्ही तुमच्या सोबत असल्याचा संदेश दिला आहे.
घटना काय घडली?
अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज नजीकच्या रहीमपूर येथे प्रतिबंधित तंबाखू, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थावरील कारवाई करत असताना, काही तंबाखू व पानमसाला विक्री करणाऱ्या लोकांनी अधिकाऱ्यावर धोकादायक पद्धतीने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर गत अधिकाऱ्यांवर गाडी चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने हल्ल्यात अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही, पण हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले गेले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?
आयुक्त मुंढे यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, “कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल.”
अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी काय भूमिका घेतली?
मंत्री झिरवळ यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट प्रसारित करत स्पष्ट केले की, या घटनेतील दोषींवर कोणतीही गय केली जाणार नाही. प्रशासनाची ताकद गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधकांसमोर स्पष्ट करण्यात येणार आहे. त्यांनी नागपूर सह राज्यभरातील एफडीए अधिकाऱ्यांना प्रत्येक कारवाईत सरकार तुमच्या सोबत असल्याचाही संदेश दिला आहे.
नागरिकांकडून राज्यभऱ्यातील कारवाईला कसा प्रतिसाद आहे?
नागरिक या कारवाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. यामुळे अधिकारी अधिक धैर्याने काम करू शकतात आणि गुटखा माफियांना कायदेशीर कारवाईची भीती वाटते.
या घटनेचा प्रशासनासाठी काय संदेश आहे?
ही घटना प्रशासनाला कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील बनवते. तसेच, राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कारवाई अधिक कठोर केली जाईल, अशी स्पष्ट हाक प्रशासनातून जात आहे.
आता पुढील पावले काय असू शकतात?
दोषींवर लवकरच कायदेशीर कारवाई होईल. तसेच, प्रशासनाच्या आणि मंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे या प्रकारच्या हल्ल्यांवर भविष्यात कठोर प्रतिसाद मिळेल, आणि अधिकारी सुरक्षित वातावरणात कारवाई करू शकतील काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
