नागपूर: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने नागपूर अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित अन्नासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या कारवाईत रेडी टू सर्व फ्रूट ड्रिंक (एनर्झल), न्युट्रास्युटीकल व अन्य संशयित अन्न पदार्थ जप्त करण्यात आले असून, एकूण किंमत तब्बल ५८,४२,३९६ रुपये आहे. एनडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई नागपूर जिल्ह्यात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमितपणे केली जाईल.
कोणत्या अन्न पदार्थांचे नमुने जप्त ?
रेडी टू सर्व फ्रूट ड्रिंक (एनर्झल) – ३६,३६६ लिटर, किंमत ५५,६७,७७९/- रुपये
न्युट्रास्युटीकल – ५३६ स्ट्रिप्स व २२ प्लास्टिक जार, किंमत १,४२,८९०/- रुपये
प्रतिबंधित अन्न पदार्थ – १६१ कि. ग्रॅ., किंमत १,३१,७२७/- रुपये
ही कारवाई कशी झाली?
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने विविध ठिकाणी तपासणी केली. संशयित अन्न पदार्थांचे नमुने घेतले गेले आणि लेबलिंग चुकीचे असल्यामुळे एनर्झल हा अन्न पदार्थ मिसब्रँडेड असल्याचे आढळले.
जप्त केलेला साठा किती आहे?
रेडी टू सर्व फ्रूट ड्रिंक (एनर्झल) चे विविध फ्लेवर्स, न्युट्रास्युटीकल व प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण १,७९,६२७ बॉटल्स व पॅकेट्स जप्त करण्यात आले असून, एकूण किंमत ५५,६८,०००/- रुपये आहे.
पुढील कायदेशीर कारवाई कशी होईल?
प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले नमुने विश्लेषणासाठी तपासले जातील. अहवालानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत योग्य कारवाई केली जाईल.
नागरिकांनी काय करावे?
अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास नागपूर अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा, असे प्रशासनाचे आव्हान आहे.
ही कारवाई सतत केली जाणार आहे का? नागपूर जिल्ह्यात अन्न सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
