नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात सुरु केलेल्या धडक कारवाई मोहिमेला मोठे यश मिळवले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यातील सात शहर- जिल्यातील विविध गोदामात धाड टाकण्यात आली. त्यात बेकायदेशीर, असुरक्षित व दर्जाहीन अन्नपदार्थ जप्त करण्यात आली.
तुकाराम मुंढे समर्थकांनी या बाबत पोस्ट समाजमध्यामानवर प्रसारित केल्या आहेत. जप्त केलेल्या मालाची किंमत लाखो रुपयांत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ही मोहिम अत्यंत परिणामकारक ठरली आहे.
ही कारवाई का सुरु करण्यात आली?
जनतेच्या आरोग्याचे रक्षण, बाजारातील अस्वच्छ व प्रतिबंधित अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवणे व औषधांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे उद्दीष्ट आहे.
कोणत्या व्यवसायांवर लक्ष ठेवले आहे?
हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, खाद्यपदार्थ उत्पादक, डेअरी, किरकोळ विक्रेते, मेडिकल स्टोअर्स व इतर व्यावसायिक.
नियमांचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई होईल?
माल जप्ती, परवाना निलंबन, संस्थापना सील करणे, कायदेशीर कारवाई, आणि अटक होऊ शकते.
९ जून २०२६ रोजी कारवाईत काय घडले?
या दिवशी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई केली. एकूण २८ धाडी टाकल्या गेल्या. जप्त मालाची किंमत ₹१,०१,२२,८४४ इतकी होती. या कारवाईत ९ व्यक्तींना अटक करण्यात आली. प्रमुख ठिकाणांमध्ये जळगाव, अहिल्यनगर, धाराशिव, नागपूर, नाशिक आणि राहाता यांचा समावेश आहे. जप्त मालामध्ये सुपारी, खाद्यतेल, खवा, पेढा, तुप, गूळ, गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा समावेश होता. या कारवाईत व्यापारातील गैरव्यवहार थांबविण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली.
नागरिकांनी काय करणे आवश्यक आहे?
सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष लक्ष देणे, अन्नपदार्थांच्या उत्पादन व साठवणुकीत गुणवत्ता नियमांचे पालन करणे, आवश्यक परवाने व नोंदी ठेवणे, तसेच प्रतिबंधित पदार्थांचा वापर आणि विक्री टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांची योग्य प्रमाणात उपलब्धता आणि सुरक्षित साठवणूक करणे आवश्यक आहे. यामुळे व्यवसाय सुरक्षित राहील, नागरिकांचे आरोग्य संरक्षित राहील आणि भविष्यातील तपासणीत कोणतीही अडचण येणार नाही. नियम पाळल्यास सरकारकडून कोणतीही कठोर कारवाई टाळता येईल.
