नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात ‘मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या वक्तव्यामुळे हलबा आणि कोष्टी समाजातील अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर इतर समाजातील नागपूरकरही नाराजी बोलून दाखवत आहे. काहींनी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि एक्सवर मुंढे यांच्या वक्तव्याला उत्तर देणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. सावजी ही विदर्भाची खाद्यसंस्कृती आणि समाजाची ओळख असल्याचे सांगत अनेकांनी आपली भूमिका मांडली आहे.
तुकाराम मुंढे नेमके काय म्हणाले?
समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार तुकाराम मुंढे म्हणतात, ‘मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन’ हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. सावजी खाद्यसंस्कृतीबद्दल अशा प्रकारचे विधान अयोग्य असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
कोणती पोस्ट सर्वाधिक व्हायरल होत आहे?
मुंढे यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर सर्वाधिक शेअर होत असलेल्या पोस्टमध्ये पुढील मजकूर आहे. ‘तुकाराम मुंढे म्हणाले सावजी खाल्ला तर १ महिना आजारी पडीन… अन् मी महिन्यातून ५ वेळा सावजी नायी खाल्ला… तर आजारी पडीन… चलो सावजी…’ ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असून त्यावर शेकडो प्रतिक्रिया आणि समर्थनाच्या टिप्पण्याही दिसून येत आहेत.
आणखी कोणत्या प्रकारच्या पोस्ट प्रसारित होत आहेत?
या पोस्टव्यतिरिक्त अनेकांनी ‘सावजी आमचा अभिमान आहे, सावजी ही विदर्भाची ओळख आहे, सावजीवर टीका सहन करणार नाही, सावजी म्हणजे परंपरा…’ अशा आशयाचे संदेश प्रसारित केले आहेत. काहींनी सावजी भोजनाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून त्याला पाठिंबा दर्शविला आहे. अनेकांनी #सावजी, #Savji, #IStandWithSavji यांसारखे हॅशटॅगही वापरले आहेत.
हलबा आणि कोष्टी समाजाची भूमिका काय आहे?
हलबा आणि कोष्टी समाजातील अनेकांचे म्हणणे आहे की, सावजी ही केवळ तिखट मटणाची पाककृती नसून विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा आणि समाजाच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या खाद्यसंस्कृतीबाबत केलेले कोणतेही अवमानकारक वक्तव्य समाजाच्या भावना दुखावणारे असल्याची भूमिका व्यक्त केली जात आहे. हलबा उद्योजक ग्रुपचे संस्थापक प्रवीण सोरते म्हणाले, सावजी म्हणजे तिखट हा विचार चुकीचा आहे. सावजी म्हणजे चव आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे. यांनी अचूक माहिती घेतल्याशिवाय सावजीवीवर काहीही वक्तव्य करणे चुकीचे आहे.
पुढे काय होण्याची शक्यता?
सध्या समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देण्याचे प्रमाण वाढत असून काही सामाजिक संघटना या प्रकरणावर पुढील भूमिका जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमी
