नागपूर: Chennai Coromandel Express Accident ओडिशात बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेससह आणखी एक प्रवासी गाडी आणि मालगाडीची धडक झाली. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या. एनडीआरएफच्या पथकांनी अपघातस्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बोगींमध्ये फसलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून गॅस कटरचा वापर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालासोर येथील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी भारतीय लष्कराची वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पथके तैनात करण्यात आली आहेत. ईस्टर्न आर्मी कमांडमधील विविध ठिकाणांवरील पथकांना  घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. हवाई दलाने दोन एम.आय. १७ हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत, अशी माहिती संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two air force helicopters over the odisha train accident site rbt 74 ysh
Show comments