scorecardresearch

महिला पोलिसाची हत्या करून रेल्वेने पळून जाणाऱ्या दोघांना नागपुरात अटक

वादातून आरोपीने आपल्या सहा साथीदारांसह हल्ला करत महिला पोलिसावर हल्ला करत तिची हत्या केली

crime news
कामगार संघटनेच्याच बनावट पत्राचा वापर केल्याप्रकरणी अभियंत्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

एका महिला पोलीस शिपायाची हत्या करून कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसने पळून जाणाऱ्या दोघांना नागपुरात अटक करण्यात आली. बिहारमधील महिला शिपायाची एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचे समजते. आरोपी मो. हसन अर्शद, मो. सज्जाद सुफी यांना रविवारी पहाटे कारवाई करण्यात आली.

हेही वाचा- धक्कादायक ! शिक्षण संस्था चालकास मागितली पंचवीस लाखांची खंडणी; आरोपी तुरुंगातच

कटिहार जिल्ह्यातील २१ वर्षीय महिला शिपायाची मो. हसन यांच्याशी मैत्री होती. मात्र शुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हापासून त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आणि हसन तिला त्रास देऊ लागला. या वादातून त्याने आपल्या सहा साथीदारांच्या मदतीने महिला शिपायावर हल्ला करून खून केला. या प्रकरणी कोडा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. तर हसन आणि सज्जाद पळून रेल्वेने पळून गेले. ते या गाडीच्या
एस-४ डब्यातील एक आणि दोन क्रमांकाच्या बर्थवर बसले होते. बिहार पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधून संबंधित आरोपीचे वॉटस ॲप छायाचित्र पाठवले होते. त्यावरू नागपूर पोलिसांनी गाडीची झडती घेतली. छायाचित्रावरून त्यात संशयित युवकांची चौकशी केली. दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना बिहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 15:31 IST
ताज्या बातम्या