scorecardresearch

नवजात बाळविक्री प्रकरणात डॉक्टरसह दोघांना अटक; टोळीप्रमुख श्वेता खानच्या अडचणीत वाढ

श्वेताने स्वत: प्रसूतीतज्ज्ञ असल्याचे घोषित करून मध्यप्रदेशात रुग्णालय सुरू केले होते. तेथून श्वेता व तिचा पती मकबुल खान यांनी नवजात बाळविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.

नवजात बाळविक्री प्रकरणात डॉक्टरसह दोघांना अटक; टोळीप्रमुख श्वेता खानच्या अडचणीत वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

नागपूर : नवजात बाळविक्री प्रकरणात तोतया डॉक्टर श्वेता ऊर्फ आयशा खान व तिचा पती मकबुल खान अहमद खान आणि डॉ. प्रवीण रतनसिंह बैस यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे दोघांनाही एएचटीयूच्या पथकाने अटक केली. पती आणि डॉक्टरच्या अटकेमुळे श्वेता खानच्या अडचणी वाढल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता खान (लालबर्रा, बालाघाट) हिने नवजात बाळविक्री करण्यासाठी मोठी टोळी तयार केली आहे. सफाई कर्मचारी असलेल्या श्वेताने स्वत: प्रसूतीतज्ज्ञ असल्याचे घोषित करून मध्यप्रदेशात रुग्णालय सुरू केले होते. तेथून श्वेता व तिचा पती मकबुल खान यांनी नवजात बाळविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. आतापर्यंत अनेक नवजात बाळांची डॉ. प्रवीण बैस (३९, न्यू बिडीपेठ, संतोषी मातानगर) याच्या वर्धा रोडवरील क्लिनिकमधून तपासणी करून सौदा करण्यात आला.

हेही वाचा: ‘’एसटी’तील पैसेकांड, लालपरीचे ‘स्टेअरिंग’ अर्धशिक्षित चालकांच्या हाती!

चार दिवसांचे बाळ गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणारे दाम्पत्य विनय आणि मोनिका सुलतयानी यांनी ३ लाखांत खरेदी केले होते. याप्रकरणी हुडकेश्वर ठाण्यात दाखल गुन्ह्यात श्वेतासह तिचा पती मकबुल खान आणि बाळांची तपासणी करून विक्री करण्यास प्रोत्साहन देणारा डॉ. प्रवीण बैस यांना अटक करण्यात आली. बाळ विक्रीच्या गुन्ह्यात आतापर्यंत ८ ते १० आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:22 IST

संबंधित बातम्या