scorecardresearch

Premium

चंद्रपूर : विजेच्या धक्क्याने दोन शेतकरी ठार

नागभीड शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्यप्राण्यासह दोन शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. गुरुदास श्रीहरी पिसे (५२) व देवनाथ रामदास बावनकर (४५) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

child death due to accidentally hanging at home
प्रातिनिधिक फोटो

चंद्रपूर : नागभीड शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्यप्राण्यासह दोन शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. गुरुदास श्रीहरी पिसे (५२) व देवनाथ रामदास बावनकर (४५) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. नागभीड शहराला लागून शेताशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस घातला आहे. शेतकरी वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या ‘झटका मशीन’ऐवजी कुंपण तारांना विद्युत प्रवाह सोडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत असतात.

नारायण लेणेकर यांनी आपल्या शेतात बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाह सोडला. या प्रवाहाचा स्पर्श झाल्याने रानडुक्कर ठार झाले. सोबतच बाजूलाच शेत असलेल्या गुरुदास श्रीहरी पिसे (५२, रा.नागभीड) यांचाही विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. नारायण लेणेकर यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुसरी घटना नागभीड शेतशिवारातच घडली. विजेच्या धक्क्याने देवनाथ रामदास बावनकर यांचा मृत्यू झाला.

Deer horns seized Karad
सातारा : बिबट्याच्या कातड्यासह गवा, भेकर, हरिणाची शिंगे हस्तगत; कराडजवळ वन पथकाची छापेमारी
panvel municipal corporation, title of environmental ambassador, families who donate ganesh idols, title of environmental ambassador for donating ganesh idols
पनवेल : गणेश मूर्तीदान करणाऱ्या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ पदवी महापालिका देणार
Guru Chandra Hartalika 2023 Gajkesari Rajyog These Three Rashi to Get Huge Bank Balance More Money Happiness Astrology
हरतालिकेला ‘गजकेसरी राजयोग’ बनल्याने तुमचीही रास होणार श्रीमंत? हत्तीवरून साखर वाटण्याचे दिवस होतील सुरु
16 Days Later Budh Gochar Vaibhav Lakshmi Making Bhadra Rajyog Till Dussehra These Three Rashi Can Get Gold Money Astrology
१६ दिवसांनी बुधदेव व वैभवलक्ष्मी ‘या’ ३ राशींमध्ये भद्र राजयोग बनवणार! दसऱ्यापर्यंत सोन्यासारखे दिवस जगता येतील

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two farmers were killed by light shock rsj 74 ysh

First published on: 20-09-2023 at 19:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×