scorecardresearch

Premium

नागपूर : दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी, नेमके घडले काय ?

नागपुरातील महापुराचा अनेकांना फटका बसला, झोपड्यांमध्ये पाणी शिरले, बहुमजली इमारतींनाही फटका बसला, व्यापारीही यातून सुटले नाहीत.

Two hundred laptops failed Nagpur
नागपूर : दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी, नेमके घडले काय ? (image – pixabay/representational image)

नागपूर : नागपुरातील महापुराचा अनेकांना फटका बसला, झोपड्यांमध्ये पाणी शिरले, बहुमजली इमारतींनाही फटका बसला, व्यापारीही यातून सुटले नाहीत. नागपूरची प्रमुख बाजारपेठ असलेल्या बर्डीतील व्यापाऱ्यांचे या पुराने तर कंबरडेच मोडले, त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणारे व्यावसायिक यांना जबर फटका बसला. काय घडले नेमके.

धंतोलीत यशवंत स्टेडियमपुढे ‘लॅपटॉप’सह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीची अनेक दुकाने आहेत. यापैकी अनेक तळमजल्यात असल्याने या दुकानांमध्ये पाणी शिरले. याच भागात ‘सिल्वर सिस्टीम’ हे ‘लॅपटॉप’चे दुकान आहे. तेथील दोनशेवर ‘लॅपटॉप’ निकामी झाले. अशाच प्रकारे इतर पाच ते दहा दुकानांची स्थिती आहे.

real estate agents, agricultural lands in uran, farmers in uran, agents forcing farmers to sell land in uran
उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर
Dangerous potholes road connecting three villages Phunde, Dongri Panje uran
उरण – फुंडे रस्ता की तलाव मार्ग? खड्ड्यातून तीन गावातील नागरिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
in dombivli illicit liquor dens at residential area
डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर नागरी वस्तीत दारूचे अड्डे, महिला, शाळकरी विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त
Unequal distribution of water, Belapur, Nerul, Digha, Navi Mumbai, Water scarcity, morbe dam
नवी मुंबईत पाणीवाटपात विषमता; बेलापूर,नेरुळला मुबलक तर दिघ्यात दुर्भिक्ष्य; पाणी वापराने नवी मुंबईत पाणीबाणी

हेही वाचा – “सत्तेसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी राज्यात पेपरफुटी”, विजय वडेट्टीवार यांचा आरोप; म्हणाले…

हेही वाचा – “मुंबईची तुंबई म्हणून बदनामी, नागपूरचा पूर राजकीय अपयश”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

‘सिल्वर सिस्टीम’चे मालक सोनी केवलरामानी म्हणाले, पंचशील चौकातील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी सर्वत्र पसरले. ते दुकानातही शिरले, माझ्या दुकानातील सुमारे दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी झाले असून सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बर्डीतील तळमजल्यावरील कापडांच्या दुकानांनाही फटका बसला. सेंट्रल मॉल, बिग बाजारच्या तळघरात पाणी काढणे रविवारपर्यंत सुरू होते. तेथे ठेवण्यात आलेला सर्व माल खराब झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two hundred laptops failed in a shop in nagpur city what happened cwb 76 ssb

First published on: 26-09-2023 at 15:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×