नागपूर : मित्राच्या प्रेयसीला वेगवेगळे आमिष दाखवून लॉजवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला देहव्यापारात ढकलत तिच्या देहाचाही सौदा केला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

विशाल ऊर्फ दत्तू दाभणे ऊर्फ खाटीक (३८), सत्यजित ऊर्फ निखिल बांगड (२३), दोघेही रा. न्यू कैलासनगर, सचिन इंगळे (३२) रा. पिपळा फाटा, आकाश ऊर्फ विक्की भोसले (३२), रा. दिघोरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर अमित लोखंडे (२३), रा. न्यू कैलासनगर हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या पाच आरोपींनी दहावीत शिकणाऱ्या मुलीला देहव्यवसायासाठी नागपुरात आणले होते. विशालने त्यांना काही दिवस आपल्या घरी ठेवले. सत्यजीत आणि सचिन यांनी हुडकेश्वर भागातील एका लॉजवर एकीवर बलात्कार केला तर दुसरीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले.