लोकसत्ता टीम

नागपूर : गृहमंत्र्यांच्या शहरातील हत्याकांडाची मालिका नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अद्यापही सुरुच आहे. एकाच रात्रीत दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली आहे. नागपूर पोलिसांचा वचक संपल्यामुळे शहरात गँगवार सुरु झाले आहे. नागपुरातील गंभीर गुन्ह्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीट्स गँगच्या सदस्याचा सेवादलनगरात जवळपास ३० जणांनी दगडांनी ठेचून खून केला तर कारागृहातून सुटून आलेल्या गुन्हेगाराचा गुंडांच्या टोळीने चाकूने भोसकून खून केला.

bmc stops immersion of pops ganesh idols due to court order
विसर्जनाविनाच गणेशमूर्ती मंडपात माघारी; न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखले
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक

हे दोन्ही हत्याकांड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले. अमोल बहादूरे (३२, सेवादलनगर, भांडेप्लॉट) असे खून झालेल्या बीट्स गँगच्या सदस्याचे नाव आहे. तर अमोल वंजारी (२२, वाठोडा) असे वाठोड्यात खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

आणखी वाचा-व्यापारी गुजरातचा, अपहरण मलकापुरातून अन् आरोपी मराठवाड्यातील!

पहिल्या घटनेत, बीट्स गँगचा सदस्य अमोल पंचम बहादूरे याने गेल्या आठ वर्षांपूर्वी तिरंगा चौकात एका युवकाचा भरचौकात खून केला होता. तेव्हापासून त्याचा तिरंगा चौकात दबदबा होता. तेव्हापासूनच तो खंडणी आणि भूखंड बळकावण्याचे काम करीत होता. त्याने दोन साथिदारांच्या मदतीने मुरुम आणि अन्य खणिज विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता.

तसेच त्याचा व्याजाचा अवैध व्यवसाय आहे. त्यासाठी त्याने घोगलीमध्ये अलिशान कार्यालय घेतले होते.पैशावरुन अमोलचा कुख्यात दिनेश गायकीसोबत चिमणाझरी येथील खदानीवरुन वाद सुरु होता. गेल्या आठ दिवसांपूर्वीच दिनेश गायका हा कारागृहातून सुटून आला.

अमोलने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दिनेश चिडून होता. दिनेशने साथिदार प्रवीण ढिंगे, शुभम हटवार, प्रतिक गाठे यांच्यासह जवळपास ३० साथिदार सेवादलनगरात जमा झाले. त्यांनी अमोलला फोन करुन तेथे बोलावले. रात्री ११.३० वाजता अमोल दोन साथिदारांसह कारने तेथे पोहचला. अमोलच्या कारला आरोपींनी घेराव घातला. घाबरेला अमोल कारमधून बाहेर निघत नव्हता. त्यामुळे आरोपींनी त्याच्या कारच्या चारही बाजुच्या काचा फोडून त्याला बाहेर खेचून काढले. भरचौकात त्याचा दगडाने ठेचून खून केला.

आणखी वाचा-विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात देशभरातील संघटना नागपुरात येणार… हे आहे कारण…

तर त्याचा साथिदार अमित भुसारी व बंटी या दोन्ही साथिदारांना गंभीर जखमी केले. रात्री उशिरा सक्करदरा पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळावरुन मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

कारागृहातून सुटताच केला खून

वाठोड्यात दहशत असलेल्या अमोल कृष्णराव वंजारी (२२, भांडेवाडी, गोंड मोहल्ला) याचा वस्तीतील गुंड एस. प्रधान राजन उईके ऊर्फ गब्बर याच्याशी वस्तीतील वर्चस्वावरुन वाद सुरु होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी अमोलने ठार मारण्याची धमकी देऊन गब्बरवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गब्बरने वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अमोलला अटक केली. गेल्या दोनच दिवसांपूर्वी अमोल कारागृहातून सुटून आला. गब्बरला जीवाची भीती होती. त्यामुळे त्याने तेजस मेंढे आणि दोन अल्पवीयन साथिदारांच्या मदतीने अमोलचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी रात्री त्याने तीन साथिदाराच्या मदतीने डंम्पींग यार्डच्या भींतीजवळ बसलेल्या अमोलला गाठले. चौघांनीही चाकूने हल्ला करुन अमोलचा खून केला.

Story img Loader