scorecardresearch

Premium

नागपूर : ‘गेम’ करण्याच्या तयारीत असलेल्या दोन कुख्यात गुंडांना पिस्तूलसह अटक

पिस्तूल घेऊन कुणाचा तरी खून करण्याच्या तयारीत असलेल्या युवकासह पिस्तूल विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी पिस्तूल आणि मॅग्झिन जप्त केली.

gangsters arrested nagpur
नागपूर : ‘गेम’ करण्याच्या तयारीत असलेल्या दोन कुख्यात गुंडांना पिस्तूलसह अटक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : पिस्तूल घेऊन कुणाचा तरी खून करण्याच्या तयारीत असलेल्या युवकासह पिस्तूल विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी पिस्तूल आणि मॅग्झिन जप्त केली. परविंदरसिंह प्रीतमसिंह घट्टरोडे (२३, बाबा दीपसिंगनगर) आणि मॉरिस एरिस्वामी फ्रांसीस (मोहननगर, खलासी लाईन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदरसिंह घट्टरोडे हा कुख्यात गुंड असून त्याचे नुकताच एका टोळीशी वाद झाला होता. हद्दीच्या वादातून त्या टोळीतील एकाने परविंदरसिंहला धमकी दिली होती. त्यामुळे त्या युवकाचा काटा काढण्याच्या कट त्याने रचला. त्याने मॉरिस फ्रॉन्सीस याच्याकडून ५० हजार रुपयांत विदेशी बनावटीची पिस्तूल विकत घेतली. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तो पिस्तूल घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या टोळीतील सदस्याला धडा शिकविण्यासाठी जात होता. ही माहिती गुन्हे शाखेच्या पथक दोनचे प्रमुख पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांना यांना मिळाली. त्यांनी लगेच सहायक निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाला सापळा रचण्यास सांगितले.

showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
foreign woman arrested in gold smuggling case
सोन्याच्या तस्करीप्रकरणी परदेशी महिलेला अटक; मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई
bhandara murder, bhandara criminal naim shaikh murder case, infamous criminal naim shaikh murdered by his enemy
कुख्यात नईमच्या खुनाचा उलगडा; वर्षांपूर्वी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला
crime news
बाणेरमधील धक्कादायक घटना; बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून तरुणाची आत्महत्या

हेही वाचा – विदेशात संशोधन कार्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती, ‘‘या” योजनेस मुदतवाढ

पोलिसांनी कपिलनगरात सापळा रचला. परविंदरसिंह तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पाठीमागे लपविलेली पिस्तूल आणि मॅग्झिन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख राहुल शिरे, गणेश पवार, गजानन कुबडे, प्रवीण शेळके, महेंद्र सेडमाके, दिनेश डवरे, आशिष वानखडे, सुनील कुवर यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two notorious gangsters arrested with pistol in nagpur adk 83 ssb

First published on: 22-06-2023 at 15:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×