scorecardresearch

Premium

गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली…

गोंदिया येथील कॅरिअर झोन एज्युकेशनल इंस्टिटयूटमधील चार विद्यार्थी रेल्वेच्या पुलाखाली पांगोली नदी येथे आंघोळीसाठी गेले असता चारपैकी एक विद्यार्थी यशराज धिरेंद्रसिंग रघुवंशी (वय १७, रा. अवंती चौक गोंदिया) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Two people died Gondia district
गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली… (प्रातिनिधिक छायाचित्र)

गोंदिया : गोंदिया येथील कॅरिअर झोन एज्युकेशनल इंस्टिटयूटमधील चार विद्यार्थी रेल्वेच्या पुलाखाली पांगोली नदी येथे आंघोळीसाठी गेले असता चारपैकी एक विद्यार्थी यशराज धिरेंद्रसिंग रघुवंशी (वय १७, रा. अवंती चौक गोंदिया) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भातील माहिती पोलीस कंट्रोल रूम येथून प्राप्त झाली असता गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे शोध व बचाव पथक घटनास्थळी पाठविण्यात आले असून शोध कार्य सुरू आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

inmate escaping from Sassoon Hospital
पुणे : ‘ससून’मध्ये अनागोंदी कारभार! विभागीय आयुक्त झाडाझडती घेणार
bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered
भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार
new twist in the molestation case
विनयभंग प्रकरणात नवे वळण, विद्यार्थिनींचे पालक म्हणतात ‘ते’ निर्दोष…
bus accident in buldhana, buldhana, student died in accident ,
बुलढाणा: भरधाव टिप्परची ऑटोला धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू; सहा जखमी

हेही वाचा – ‘तिजोरी’ भरण्यासाठी वाट्टेल ते? कोतवाल व्हायचे तर पाचशे रुपये शुल्क, अर्जही फुकट नाही

दुसऱ्या घटनेत देवरी तालुक्यात प्रख्यात असलेल्या धुकेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या पवन तलावात एका तरुणाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तलावात उडी घेवून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सागर राजनकर वय २६ वर्षे रा. देवरी असे असून देवरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी तलावात शोध मोहीम राबवून या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सागरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two people died in two different incidents in gondia district sar 75 ssb

First published on: 26-09-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×