scorecardresearch

‘त्याने’ ऑटोतून उडी घेतली अन् घात झाला

नागपूर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

‘त्याने’ ऑटोतून उडी घेतली अन् घात झाला
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाठोडा आणि पारडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले. मनोज वसंत निहारे (३८, एकतानगर, पारडी) आणि योगेश हरिश्चंद्र डहारे (३८, रा. निलकमलनगर, दिघोरी) असे मृत युवकांची नावे आहेत.

हेही वाचा- ‘मला सासू-सासऱ्याने मारहाण केली, मी…’; पोलिसांना फोन करून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पहिल्या घटनेत, रोशन पाल आणि मनोज निहारे दोघेही मित्र शुक्रवारी रात्री बाराद्वारी परिसरातून ऑटोने घरी जात होते. बाराद्वारीजवळ चालक रोशनने अचानक वळण घेतले, त्यामुळे मनोज घाबरला. त्याने ऑटोतून उडी घेतली. दरम्यान मागून भरधाव आलेल्या ट्रकने मनोजला धडक दिली. मनोज ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्यू पावला.

हेही वाचा- वाशीम: ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा स्वपक्षीय महिला नेत्यावर चाकू हल्ला; जिल्हा प्रमुखास अटक

दुसऱ्या घटनेत, आशीष तितरमारे आणि योगेश डहारे हे शुक्रवारी रात्री दहा वाजता दुचाकीने घरी जात होते. आराधनानगरातील बसस्टॉपसमोरून जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. योगेश हा ट्रकखाली चिरडल्या गेल्याने जागीच मृत पावला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 10:52 IST

संबंधित बातम्या