गोंदिया:महाराष्ट्राच्या सीमेवरील, छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीच्या हद्दीत आज, सोमवारी सकाळी ८:३० वा. च्या सुमारास १२-१४ नक्षल्यांनी चहा पिण्याकरिता विनाशस्त्र आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन पोलीस जवान शहीद झाले तर एक जखमी आहे. राजेश प्रतापसिंह व ललीत यादव, असे शहीद पोलीस जवानांची नावे आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा >>>नागपुरात खासगी मनोरंजन वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद, जाणून घ्या काय आहे वाद

bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहका-यासह सोमवारी सकाळी चहा पिण्याकरिता दुचाकीने राज्यमार्गावरील ढाब्यावर गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात राजेश प्रतापसिंह व ललीत यादव शहीद झाले तर तिसरा पोलीस जवान जखमी आहे. जखमी शिपायामुळेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. नक्षल्यांनी दुचाकीला आग लावून घटनास्थळावरून पोबारा केला.

हेही वाचा >>>नागपूर: विकृतीग्रस्त गर्भ असल्यामुळे शेतकरी मातेने उचलले ‘हे’ पाऊल…

ही घटना राजनांदगाव (छत्तीसगड ) जिल्ह्यात घडली असली तरी खबरदारी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सीमेवर सी -६० जवान आणि पोलिसांची अधिकची कुमक तैनात करण्यात आली आहे. सिमेवरील नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर गोंदिया पोलिसांची करडी नजर असल्याची माहिती गोंदिया जिल्हा नक्षल सेलचे प्रमुख दिनेश तायडे आणि गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.