scorecardresearch

क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात

दोन्ही तरुणी नागपुरातील एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे.

क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर रशियातून नागपुरात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या दोन रशियन तरुणींना सदरमधील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही तरुणी नागपुरात देहव्यवसायासाठी आल्या होत्या, अशी माहिती आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी नागपुरात भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्यात येणार आहे. त्यामुळे नागपुरात विदेशातील क्रिकेटप्रेमींची गर्दी वाढणार आहे. अनेक विदेशी पाहुणे नागपुरातील नामांकित हॉटेलमध्ये थांबतात. ही बाब लक्षात घेऊन रशियन-युक्रेन या देशातील दोन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. दोन्ही तरुणी नागपुरातील एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यांचा व्हिसा दलालाने जप्त केल्याची माहिती आहे. यापूर्वीही नागपुरात रशियन तरूणी देहव्यापार करण्यासाठी आल्या असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती, हे विशेष.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या