scorecardresearch

खळबळजनक! मठातील दोन जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या

दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला असून भद्रावती तालुक्यात मांगली या गावातील जगन्नाथ बाबा मठ येथे दानपेटी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Murder
(प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूर : दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला असून भद्रावती तालुक्यात मांगली या गावातील जगन्नाथ बाबा मठ येथे दानपेटी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी

गुढपाडव्याच्या दिवशी २२ मार्च च्या मध्यरात्री ही घटना उघडकीस आली आहे. जगन्नाथ बाबा मठ येथे अज्ञात दरोडेखोरांनी दानपेटी चोरण्यासाठी प्रवेश केला असता बापूजी खारकर (७२) व मधुकर खुजे (७५) यांनी त्या दरोडेखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करीत त्यांच्यावर सब्बलने वार करीत हत्या केली. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर: रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी शासनाची नवी योजना

हत्येनंतर दरोडेखोरांनी दोन्ही वृद्धांना खाटेवर टाकत दानपेटी घेऊन पसार झाले. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मांगली गाव हादरुन गेले असून त्याठिकाणी चंद्रपूर पोलिसांचा ताफा मांगली गावात दाखल झाला आहे. दरम्यान, ही घटना दानपेटीच्या चोरीतून झाली की अन्य काही कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या