लोकसत्ता टीम

नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दहा दिवसांपूर्वी याच ठिकाणी वाघिणीचा एक बछडा मृतावस्थेत सापडला होता. तर त्याच्या दोन दिवस आधी एका बछड्याला ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात उपचारासाठी आणले.

Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

दरम्यान, या वाघिणीचा शोध वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी घेत आहेत. राज्यात नववर्षाच्या सुरुवातीपासूनच वाघांच्या मृत्यूच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. आतापर्यंत सात वाघ मृत्युमुखी पडले असून वाघांचे मृत्यू संशयास्पद आहेत. तर बछड्यांचे मृत्यूदेखील उपासमारीने झाल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार

२०२३ मध्ये राज्यात वाघांच्या मृत्यूची संख्या खुप मोठी होती. तर २०२४ मध्ये ही संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली. मात्र, २०२५ची सुरुवातच वाघांच्या मृत्यूने झाली. दोन जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका शेतकऱ्याच्या शेतातील नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला. वाघाचे सर्व अवयव शाबूत असले तरीही शेतातील ओढ्याजवळचा मृत्यू संशयास्पद होता.

त्यानंतर सहा जानेवारीला भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत घनदाट जंगलात वाघाचा मृतदेह आढळला. यावेळी वाघाच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन जंगलात फेकण्यात आले होते. सात जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?

वाघाचे दोन दात आणि १२ नखे गायब होती. आठ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या पाच ते सहा महिन्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्या पोटात काहीच अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला.नऊ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या मादी बछड्याचा मृतदेह आढळला. मोठ्या नर वाघाने या बछड्याला मारल्याचे समोर आले. १४ जानेवारीला गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका-भानपूर परिसरात मंगळवारी सकाळी वाघाचा मृतदेह आढळला.

तर आता १५ जानेवारीला पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत देवलापार वनपरिक्षेत्रात नवेगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ४८७ मध्ये वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला. यावेळी मृतदेह जवळजवळ कुजलेला होता. या वनक्षेत्रातून जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात वाघिणीचा एक बछडा कमजोर अवस्थेत वनखात्याला सापडला. या बछड्यावर नागपूर येथील वनखात्याच्या सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचार सुरू असून तो आता उपचाराला प्रतिसाद देत आहे. तर इतर दोन बछड्यांचे कुजलेले मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या बछड्यांच्या आईची शिकार तर झाली नसावी ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

Story img Loader