scorecardresearch

Premium

गोंदिया:भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; २ महिलांचा मृत्यू

मृत महिलामध्ये सत्यशिला ब्रिजलाल बिसेन(३६) व सुनीता सूरजलाल बिसेन(२३)रा. पोकरटोला (टेकरी)ता.आमगाव यांचा समावेश आहे.

two women died on the spot after speeding tipper truck collided with motorcycle
टिप्परने मोटारसायकल स्वारास दिलेल्या धडकेत मोटारसायकल वरील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू

आमगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरठाजवळील कालव्याजवळ आमगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने मोटारसायकल स्वारास दिलेल्या धडकेत मोटारसायकल वरील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली.

हेही वाचा >>> नदीवर पार्किंगसाठी ६० फूट स्लॅब टाकल्याने नागपुरात पूर,ॲक्वा पार्कसाठी नदीवर अतिक्रमण

World Senior Citizens Day Navi Mumbai
ज्येष्ठ नागरिकांच्या कला-क्रीडा गुणांच्या कौतुकाने सजला नवी मुंबईत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
Two people died Gondia district
गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली…
Devendra Fadnavis on Nagpur heavy rain flood
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एका आजींचा मृत्यू…”
Woman died tiger attack Fari-Zari forest area Desaiganj taluka gadchiroli
वाघिणीच्या हल्ल्यात महिला ठार, देसाईगंज वनपरिक्षेत्रातील घटना; नागरिकांमध्ये दहशत

टिप्पर क्रमांक एम.एच. ३५ ए.जे. १०२१ ने मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३५ एम.७५६५ ला धडक दिली. मृत महिलामध्ये सत्यशिला ब्रिजलाल बिसेन(३६) व सुनीता सूरजलाल बिसेन(२३)रा. पोकरटोला (टेकरी)ता.आमगाव यांचा समावेश आहे. ठाणा येथे मुलीच्या येथील घरगुती कार्यक्रम आटोपून दिपक ब्रिजलाल बिसेन सोबत मोटारसायकलने गावाकडे जात असतांना ही घटना घडली. मोटारसायकल चालक दिपक बिसेन गंभीर जखमी असल्याने त्यास आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच घटना स्थळी आमगाव पोलीसानी  पोहचून गंभीर जखमी ला रूग्णालयात दाखल केले. पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two women died on the spot after speeding tipper truck collided with motorcycle sar 75 zws

First published on: 28-09-2023 at 18:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×