scorecardresearch

Premium

यवतमाळ: दोन युवकांना देशी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक

एकूण एक लाख दोन हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून  आरोपींना अटक करण्यात आली.

two youths arrested with two desi pistol
दोन युवकांना दोन देशी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली.

शहरातील कळंब मार्गावर दोन युवकांना दोन देशी  कट्टे  व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गाझी अली अफसर अली रा. कळंब चौक व प्रफुल्ल भारत शंभरकर रा. सेजल रेसिडन्सी, यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सोमवारी गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पांढरकवडा मार्गावरील मालानी बाग समोर दोन तरुण पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून मिळाली.

हेही वाचा >>> बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले “अपंगांच्या योजना…”

Buldhana Cyber ​​Police arrested two Nigerian nationals Delhi online fraud
ऑनलाईन ६५ लाखांची फसवणूक; दोन ‘नायजेरियन’ युवकांना दिल्लीतून घेतले ताब्यात
pune municipal corporation, pmc warning about abandoned vehicles, abandoned vehicles on road in pune, pune ganeshotsav 2023
पुणे महापालिकेचा फतवा : रस्त्यांवरील बेवारस वाहने ताबडतोब काढा अन्यथा जप्ती
Princess Diana black sheep sweater
तब्बल ९ कोटी रुपयांना विकला ‘हा’ लाल स्वेटर! यात काय आहे खास? लोक हवी तितकी रक्कम मोजायला तयार
police take preventive action aagainst gangsters in pune
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांची झाडाझडती

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरटीओ परिसरात पोहचून तरुणांचा शोध घेतला. मालानी बाग समोर  दोन तरुण संशयास्पद स्थितीत उभे होते.  त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीच्या काळया रंगाची मैग्जीन असलेल्या दोन पिस्टल (किंमत प्रत्येकी ५० हजार) आढळल्या.   पिस्टल ताब्यात घेऊन पाहाणी केली असता  जिवंत काडतुसही सापडले.  एकूण एक लाख दोन हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून  आरोपींना अटक करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two youths arrested with two desi pistol and live cartridges in yavatmal city nrp zws

First published on: 03-10-2023 at 18:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×