नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी “मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह यायला लागतात,” असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.”

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : VIDEO: “हाताच्या पंजाची नागफणी करून…”, लोकायुक्त विधेयकावरून असीम सरोदेंचा हल्लाबोल, म्हणाले, “अण्णा हजारे…”

“”मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण…”

“मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आलं की पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये महाराष्ट्र सरकारने केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“१८ व्या शतकापासून सीमाभागात मराठी भाषा कशी वापरली जाते”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे. साधारणतः १८ व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवलं आहे. त्यात जुन्या मराठी पाट्या, प्रशासकीय कामकाजाचे मराठीतील कागदपत्रं आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवलं आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत. परंतु त्या फिल्मच्या अर्ध्या भागात ऑडिओच नाही.”

हेही वाचा : Photos : नक्षलवाद्यांची धमकी ते शरद पवार मुख्यमंत्री असतानाची घटना, अजित पवारांची अधिवेशनातील महत्त्वाची वक्तव्ये

“या पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी”

“मी तुम्हाला हा पेन ड्राईव्ह देऊ इच्छितो. आपण तो पेन ड्राईव्ह घ्यावा. माझी विनंती आहे की, या पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून नव्या पिढ्यातील लोकप्रिय सदस्यांना हा ठराव म्हणजे काय, तो कशासाठी केला जातो आहे, आपण का सीमाभागातील जनतेच्या पाठिशी उभं राहायचं हे कळेल,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.