scorecardresearch

“अतिरिक्त ‘वर्कलोड’मुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी”, सुषमा अंधारेंचं विधान; म्हणाल्या, “बच्चू कडूंना…”

देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, एकदा नियोजित समितीची बैठक घेण्यापलीकडे ते जिल्ह्यात आले नाहीत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

“अतिरिक्त ‘वर्कलोड’मुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी”, सुषमा अंधारेंचं विधान; म्हणाल्या, “बच्चू कडूंना…”

अतिरिक्त ‘वर्कलोड’मुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कूचकामी ठरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. बच्चू कडूंसारखे अनेक जण काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांना संधी द्यावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

अकोल्यात प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय नेत्यांवर सातत्याने हल्ल्याच्या घटना घडत आहेत. हे सगळे चित्र बघता राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कामाचा खूप ताण आहे. त्यांनी जबाबदारीचे वाटप करावे. त्यांच्याकडील अनेक जण संधीच्या शोधात आहेत.

हेही वाचा >>> “शिंदेच्या बंडामागचे खरे सूत्रधार फडणवीसच”; खासदार खैरे यांचा आरोप

बच्चू कडू देखील गृहमंत्री म्हणून चांगले काम करू शकतील. मात्र, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, एकदा नियोजित समितीची बैठक घेण्यापलीकडे ते जिल्ह्यात आले नाहीत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. हक्कभंग समितीचा घोळ काही लक्षात येत नाही. हक्कभंगाचा प्रस्ताव आपल्याकडे कलम १०४ किंवा १९४ नुसार दोन्ही मंडळाकडे सादर केला जातो. हक्कभंग प्रस्तावासाठी आक्रमक झालेले भाजपचे लोक त्यांच्याच पक्षाचे नेते जेव्हा महापुरुषांबद्दल अपशब्द काढतात, त्यावेळी हक्कभंग का आणत नाही? तेव्हा साधी निंदा देखील हे लोक करीत नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 09:18 IST
ताज्या बातम्या