शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडणार असल्याचा सूचक इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, असा सूचक इशारा दिला. ते सोमवारी (२६ डिसेंबर) नागपूरमध्ये विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “बॉम्ब बरेच आहेत, वाती काढल्या आहेत, फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे. मात्र, मला वाटतं आधी ताबोडतोबीने सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बरबाद होणं थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. त्या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. आंदोलनं केली आहेत.”

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
PM Narendra Modi ED Arrest
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झाली होती ईडी चौकशी’; भाजपाचे नेते म्हणाले, “ते नऊ तास…”

“त्यांनी लाठ्याकाठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या, जेव्हा ते आमच्यात होते”

“आता काहीजण म्हणतात की, तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. असं म्हणणाऱ्यांनी लाठ्याकाठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या, जेव्हा ते आमच्यात होते. मात्र, त्याचा अर्थ त्यांनी आता गप्प बसावं असा नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा विवादास्पद भाग केंद्रशासित झाला पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत”

दरम्यान, उद्धव ठाकरे सीमावादावर बोलताना म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.”

“”मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण…”

“मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आलं की पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये ७० च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म दिली आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे.

“१८ व्या शतकापासून सीमाभागात मराठी भाषा कशी वापरली जाते”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे. साधारणतः १८ व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवलं आहे. त्यात जुन्या मराठी पाट्या, प्रशासकीय कामकाजाचे मराठीतील कागदपत्रं आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवलं आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत. परंतु त्या फिल्मच्या अर्ध्या भागात ऑडिओच नाही.”

हेही वाचा : VIDEO: “हाताच्या पंजाची नागफणी करून…”, लोकायुक्त विधेयकावरून असीम सरोदेंचा हल्लाबोल, म्हणाले, “अण्णा हजारे…”

“या पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी”

“मी तुम्हाला हा पेन ड्राईव्ह देऊ इच्छितो. आपण तो पेन ड्राईव्ह घ्यावा. माझी विनंती आहे की, या पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून नव्या पिढ्यातील लोकप्रिय सदस्यांना हा ठराव म्हणजे काय, तो कशासाठी केला जातो आहे, आपण का सीमाभागातील जनतेच्या पाठिशी उभं राहायचं हे कळेल,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.