नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शनिवारी नागपुरातील मथूरादास मोहता विज्ञान काॅलेजला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातही त्यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत नवीन माहिती दिली. त्यांच्या मुलाने गोवा येथून ३०० कंटेनर मासोळी घेऊन सर्बिया या देशात पुरवठा केल्याचे सांगितले. गडकरी पुढे म्हणाले, लवकरच ॲडव्हांटेज विदर्भ हा कार्यक्रम घेणार आहे. त्यातून येथील व्यवसाय बळकट करण्यासह नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध केली जाईल. विदर्भातील तलावात चांगले झिंगे तयार होतात. या झिंग्याला नागपुरात ८०० रुपये प्रति किलो भाव आहे. दरम्यान सिंगापूरला झिंग्याला ८ हजार रुपये प्रति किलो तर दुबईत ७ हजार रुपये प्रति किलो भाव आहे. त्यामुळे येथील झिंगे तेथे पाठवल्यास मत्स व्यवसायिकांना मोठा लाभ शक्य आहे.

माझ्या मुलाने गोवा येथून ३०० टन मासोळी घेऊन ती सर्बिया येथे पाठवली. देशातील खाऱ्या व गोड पाण्यातील मासोळीच्या व्यवसायातही मोठी संधी असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ४०० रुपयात साडी दरम्यान नागपुरात ४०० रुपयांमध्ये सुंदर साडी तयार केली असून येथे कोस्यापासून तयार साडीला प्रिंट करून चांगला भाव मिळत असल्याचे गडकरी म्हणाले. नागपुरात नेदरलॅन्डच्या कंपनीला सोबत घेऊन कचऱ्याचे वर्गिकरण करून त्यापासून सीएनजीसह इतर उत्पादन घेणारा प्रकल्प सुरू केला भविष्यात पारडीतील भांडेवाडीत कचरा शिल्लक राहणार नसल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Crime News
Crime News : ‘बाबा मलाही पेटवून देतील’, अडीच वर्षीय चिमुरड्याचं विधान आणि धक्कादायक प्रकार आला समोर; व्यापार्‍याला अटक
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
36 year old man attacked police officers at gadevi with stone on Thursday
सराफ बाजारात कारागिराकडील २० लाखांचे दागिने चोरी; पिशवी हिसकावून चोरटे पसार
Farmers led by Kapil Patil met thane collector to proper compensation for road affected farmers
रस्तेबाधित शेतकऱ्यांना लवकर मोबदला द्या, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
pimpri chinchwad 43 properties
पिंपरी :…तर २२१ कोटी रुपयांच्या ४३ मालमत्ता महापालिकेकडे जमा होणार, वाचा काय आहे प्रकरण?
vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
Police seize Rs 6 to 7 crore worth of cash from Rajkamal Laundry in Indira Nagar Tumsar
भंडारा: खळबळजनक! लॉन्ड्रीतून मिळाले ७ कोटी; रक्कम कुणाची?
school van driver crime bhandara
भंडारा : स्कूल व्हॅन चालकाचे चिमुकलीसोबत गैरकृत्य, पालकांची पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा…अमरावती: चिमुकल्याच्या ‘त्या’ श्रवणयंत्रासाठी मातेचे आर्जव…

कार्यक्रमाला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव (पर्यटन) डॉ. अतुल पाटने, शहा, डॉ. गजानन डांगे, विकास बिंझानी, देव, सतीश दंदे, डॉ. जय देशमुखसह महाविद्यालयातील अनेक नावाजलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.

वायू प्रदूषणावर संशोधन हवे…

गरज आणि प्रादेशिक संधीनुसार संधोधनाची गरज आहे. सध्या आपल्याला वायू प्रदुषण भेळसावत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांसह संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा…सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! वंदे भारत, तेजस एक्स्प्रेससह ३८५ आलिशान गाड्यातून एलटीसी सवलत

२२ लाख कोटी शेतकऱ्यांकडे जायला हवे…

देशात १०० टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहने वाढणार आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल, डिझेलसह इंधनासाठीचे २२ लाख कोटी रुपये वाचतील. शेतकऱ्यांच्या पिकापासून इथेनाॅल तयार होणार असल्याने हे २२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडे जायला हवे, असेही गडकरी यांनी सांगितले. मथूरादास मोहता विद्यान महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण झाले असून येथील शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवल्याने ते देश- विदेशात मोठ्या पदांवर काम करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Story img Loader