लोकसत्ता टीम

नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा मानव जातीवर पडणाऱ्या विपरीत परिणामांबाबत वैज्ञानिक समुदायाने सतर्क राहून याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. चंद्रशेखर यांनी केले .

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

राष्ट्रीय पर्यावरण संशोधन अभियांत्रिकी संस्था- नीरीच्या वतीने आयोजित ‘वन वीक वन लॅब ‘ या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. विज्ञानामध्ये नैतिकता ही सर्वात महत्त्वाची असते असे सांगून आज समाज माध्यमावर विज्ञान तंत्रज्ञानाच्या विषयी पसरणाऱ्या गैरसमज तसेच चुकीच्या माहिती संदर्भात देखील वैज्ञानिकांनी दक्ष राहून त्यासंदर्भात प्रबोधन करणे आवश्यक आहे असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे सीएसआयआरच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना निधी पुरवल्या जात असून नीरी संस्थेने पर्यावरण तसेच नेट झिरो कार्बन उत्सर्जनामध्ये प्रामुख्याने हातभार लावला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. संस्थेचे संचालक डॉ . अतुल वैद्य यांनी निरीच्या संशोधन कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिलीयाप्रसंगी निरीच्या वैज्ञानिक डॉ . साधना रायलू यांनी निरीच्या पर्यावरणीय बदल केंद्राबद्दल माहिती दिली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाव्दारे पुरस्कृत या केंद्राद्वारे प्रामुख्याने विदर्भातील औष्णिक केंद्रात निघणाऱ्या प्रदूषणाचे हवामानात होणारे बदल यामध्ये संशोधन होणार असल्याची त्यांनी सांगितले .