scorecardresearch

नागपूर: ९ व १० फेब्रुवारीला महाराष्ट्र बँकेचा देशव्यापी संप

बँकेत पुरेशा प्रमाणात कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करून बँकेचे मुख्य काम हंगामी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्याचे धोरण व्यवस्थापनाचे आहे.

united forum of mahabank unions
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

युनायटेड फोरम ऑफ महाबॅंक युनियन्सने ९ आणि १० फेब्रुवारीला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अखिल भारतीय संप पुकारला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध यापूर्वी युनियन्सने २७ जानेवारी २३ ला संप पुकारला होता व त्यात ९३ टक्के कर्मचारी सहभागी झाले होते,असा दावा युनियन्सने केला आहे.मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.

हेही वाचा >>> नागपूर: शरद पवारांनी उद्घाटन केलेल्या कार्यालयापासून नागपूर राष्ट्रवादीने हात झटकले

बँकेत पुरेशा प्रमाणात कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करून बँकेचे मुख्य काम हंगामी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्याचे धोरण व्यवस्थापनाचे आहे. यामुळे बँकेच्या कामकाजाती गोपनियता ,ग्राहकांच्या ठेवी व त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्दयांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठीयुनायटेड फोरम ऑफ महाबॅंक युनियन्सने संप पुकारल्याचे नागपुरात पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 19:49 IST