नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीला रविवारी ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. मतदारांचे मतदान केंद्र बदलल्याने आणि प्रशासनाकडून मतदान वाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे आवाहन किंवा प्रचार प्रसार न केल्याने केवळ २३ टक्केच मतदान झाले आहे. मागील वेळेस ४१ टक्के मतदान झाले होते. पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी २१ मार्चला मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुपारी संताजी महाविद्यालयाच्या केंद्रावर मतदान केले. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील १०२ केंद्रांवर रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार, अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधरांना निवडून देण्याकरिता न्यायालयाने फटकारल्यानंतर वेळापत्रक घोषित करण्यात आले. त्यानुसार रविवारी या १० जागांकरिता ५१ उमेदवारांमध्ये लढत झाली. विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर शहरात सर्वाधिक ३५ मतदान केंद्र, तर नागपूर जिल्ह्यामध्ये २२, भंडारा २१, गोंदिया ११ तर वर्धा १३ असे एकूण १०२ मतदान केंद्र संलग्नित महाविद्यालयांमध्ये निश्चित करण्यात आले होते.

pm Narendra Modi Kanhan
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा : नागरिकांना शर्ट, टोपी, सॉक्स काढायला लावले… काय आहे कारण ?
Rashmi Barve, Supreme Court,
रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…
Waiting for the revised voter list possibility of Adhisabha election only after Lok Sabha
सुधारित मतदार यादीची प्रतीक्षाच, लोकसभेनंतरच अधिसभा निवडणुकीची शक्यता
prakash ambedkar
‘वंचित’ स्वंतंत्र लढणार! लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नागपूरमध्ये ‘या’ उमेदवाराला पाठिंबा

हेही वाचा >>> “राहुल गांधींना चीनबद्दल सहानुभूती पण…”, अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “म्हणूनच काँग्रेस…”

विद्यापीठाकडे सर्व मतदारांचे पत्ते, भ्रमणध्वनी क्रमांक असतात. असे असतानाही मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कुठलीही प्रचार मोहीमही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांना मतदानाबाबत उत्सुकता नसल्याने विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका निवडणुकीला बसला आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मतदारांमध्ये मोठी घट झाली आहे. मतदान कमी झाल्याचे याचा फटका कुणाला बसणार की, निवडणुकीत उतरलेल्या नवीन संघटनांचा याचा फायदा होणार हे मंगळवारी मतमोजणीवरून समजणार आहे.

हेही वाचा >>> कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार? निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…

गोंधळामुळे मतदारांना मन:स्ताप

पदवीधरची ही निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये होणार होती. त्यावेळी अनेकांचे मतदान हे नागपूर येथील मतदार केंद्रांवर होते. मात्र, आता त्यांनाच भंडारा, लाखांदूर तर देवरी येथील मतदान केंद्र देण्यात आल्याने अनेकांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. इतर शहरांमधील अनेक मतदारांचे मतदान केंद्र हे दुसऱ्या शहरात देण्यात आल्याने मतदारांना मन:स्ताप झाला. संध्याकाळच्या सुमारास मतदान वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अचानक दोन वाजताच्या दरम्यान जोरदार हवा आणि पाऊस झाल्याने मतदानासाठी संध्याकाळी फारसे कुणी भटकले नाही.

विद्यापीठ अधिसभेचे आजचे मतदान शांततेत झाले. जवळपास २३ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली.

– डॉ. राजू हिवसे, कुलसचिव, रातुम नागपूर विद्यापीठ.

हेही वाचा >>> विदर्भ संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईच्या कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक

अभाविपच्या मदतीला आमदारांची फौज

भाजपप्रणीत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेला यावेळी पदवीधर गटातील दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानात चक्क आमदारांची मदत घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बऱ्याच केंद्रावर भाजपच्या आमदारांनी हजेरी लावली. याशिवाय नागपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना जबाबदारी देण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संताजी महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणी मंगळवारी

दहा जागांसाठी मंगळवारी २१ मार्चला सकाळी १० वाजतापासून विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल.

अशी आहे टक्केवारी

जिल्हा – मतदान केंद्र – टक्केवारी

नागपूर शहर – ३५ – २३.१४

नागपूर ग्रामीण – २२ – २५.६५

भंडारा – २१ – २०.५१

गोंदिया – ११ -२१.५३

वर्धा – १३ – २६.११