नागपूर: नागपुरात गुरुवारी (९ मे) सकाळी ९ वाजतापासून पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अनेक भागात वृक्ष व त्याच्या फांद्या वीज यंत्रणेवर पडल्या. त्यामुळे या भागासह तर तांत्रिक कारणाने नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज कर्मचाऱ्यांनी तक्रार मिळताच घटनास्थळ गाठले. परंतु पावसाचा जोर जास्त असल्याने बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेच्या दुरुस्तीला अडचण येत होती.

हेही वाचा >>> भर दिवसा नागपूर काळवंडले; सोसाट्याचा वारा, मुसळधार पावसाने शहराला झोडपले

Zika, zika virus news,
आता नवीन संकट! गभर्वती महिलांनाही झिकाची लागण
Zika, Pune, rural areas, patients,
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
tiger attack
शेवटी आईच ती…..बछड्यांना धोका दिसताच वाघीण माघारी फिरली अन्….व्हीडीओ एकदा बघाच…
Heavy rainfall causes flooding in Mumbai
प्रशासनाचे दावे पाण्यात; पहिल्या मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण; रस्त्यांवर पाणी, रेल्वे ठप्प
One lakh farmers out of loan process
यवतमाळ : तब्बल एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर
8 Zika patients found in maharashtra in two months
राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
BLS predicts a 10 percent increase in Spain visa applications
स्पेनच्या व्हिसा अर्जात १० टक्क्यांनी वाढीचा ‘बीएलएस’चा अंदाज
Modi Government Dissatisfaction among farmers Political dividends
लेख: शेतकऱ्याला लाभार्थी नव्हे, सक्षम करा!

वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात वंजारी नगर, प्रतापनगर, जानकीनगर, भोले बाबा नगर, विठ्ठल नगर, सरस्वती नगर, धरमपेठचा काही भाग, गायत्री नगर, दक्षिण नागपूरचा काही भाग, मध्य नागपुरच कही भागसह शहरातील अनेक भागांचा समावेश होता. खंडित झाल्याची माहिती कळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज यंत्रणेतील दोष शोधण्याचे काम हाती घेत दुरुस्ती सुरू केली. काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करता येत नव्हती. त्यामुळे ते पाऊस कमी होण्याची वाट बघत होते. दरम्यान काम शक्य असलेल्या परिसरात मात्र काही मिनीटात वीज पुरवठा सुरळीत केल्याचा महावितरणचे दावा आहे. दरम्यान वृक्ष वीज यंत्रणेवर पडलेल्या भगत अग्निशमन दलाची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष बाजूला सारल्यावर वीज तार जोडण्यासह इतर कामे केली जाईल. त्यापूर्वी वीज पुरवठा इतर भागातून वाळवून वीज सुरळीत करण्याचे महावितरणकडून प्रयत्न होणार आहे.