scorecardresearch

नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी, मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

उपराजधानीसह विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली

unseasonal rain
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीसह विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात मंगळवारपासूनच पाऊस दाखल झाला, तर बुधवारपासून इतरही जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिला असून गुरुवारी काही जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा देखील इशारा दिला आहे.

बुधवार सायंकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. सगळीकडेच आकाश ढगांनी गच्च भरले आहे. चंद्रपूर शहरात बुधवारी पावसाने हजेरी लावली, तर बुलढाणा शहरातदेखील काल पावसाच्या सरी कोसळल्या. नागपूर शहरात मंगळवरपासूनच आभाळी वातावरण असून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सगळीकडे वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असून आकाश ढगांनी गच्च भरले आहे. अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट सुरू झाला असून कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस कोसळेल अशी स्थिती आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, बुलढाणा या जिल्यांमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा देखील इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही पिके काढणीला आल्यामुळे शेतकरी देखील धास्तावला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात आज पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ढगाळ वातावरण आहे. सध्या हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत.

जिल्ह्यातील अनेक भागात आज पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ढगाळ वातावरण आहे. सध्या हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 09:22 IST