चंद्रपूर : जगातील सर्व देशांच्या राजधान्या व त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम प्रस्थापित केलेल्या अडीच वर्षीय वैदिशा शेरेकर हिने संगीत क्षेत्रातही चमकदार कामगिरी केली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईची संगीत परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

वैदिशाने वयाच्या केवळ अडीच वर्षातच जगातील सर्व देशांच्या राजधान्या व त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम केला असून तिच्या नावाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थांनी घेतली आहे. वैदिशाची असाधारण बुद्धिमत्ता पाहून वडील वैभव शेरेकर यांनी तिला संगीत शिकवण्याचा निर्णय घेतला. वैदिशाच्या वडिलांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई, परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरला. मात्र, त्यावेळी वैदिशा केवळ पावणेचार वर्षांची असल्यामुळे तिला परीक्षेला बसता येणार नाही. दोन ते तीन वर्षांनंतर तिला परीक्षा देता येईल, असे मंडळो वैभव शेरेकर यांना कळवले. दरम्यान, शेरेकर यांनी तिच्या असाधारण बुद्धिमत्तेची कल्पना व तिच्या कामगिरीची मंडळाला माहिती दिली. ती ऐकून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई येथील तज्ज्ञांनी तिला परीक्षा देण्यास सहमती दर्शवली. सत्राच्या शेवटी मुंबई येथील चमूने परीक्षा घेतली. वैदिशाने आपली चमक दाखवली. प्रश्नांची सरळ व अचूक उत्तर देत तिने सर्वांना अचंबित केले व प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षकांच्या मते इतक्या लहान वयात इतके पाठांतर व इतके कठीण असलेले स्वर, राग, थाट इत्यादी लक्षात ठेवणे हे एक आश्चर्यच आहे. त्यामुळे वैदिशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान