जिंकण्याची ओढ अन् रसिकश्रोत्यांचा प्रतिसाद

वक्ता दशसहस्रेषू विभागीय अंतिम फेरी

वक्ता दशसहस्रेषू विभागीय अंतिम फेरी

नागपूर : विभागीय असली तरी अंतिम फेरीचे टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. प्राथमिक फेरीत नव्हती, तेवढी आज प्रत्येकाच्या हातात वही आणि पेन होते. थोडय़ा थोडय़ा वेळात प्रत्येकजण बाहेर जाऊन सराव करून येत होते.

विभागीय अंतिम फेरीत आज प्रत्येक स्पर्धक गंभीर होता. जिंकण्याची ओढ होतीच, पण आपल्यापेक्षा आपला स्पर्धक सरस तर ठरणार नाही ना, यामुळे स्पर्धा सुरू असलेल्या सभागृहातच त्यांची पावले थबकली होती. पाल्याला पाठिंबा देण्यासाठी पालकांसोबतच त्या स्पर्धकांची मित्रमंडळी देखील आज मोठय़ा संख्येने उपस्थित होती. आपला पाल्य घाबरून खाली आला तर त्याला समजावणारे हेच पालक होते आणि स्पर्धक ओळखीचा असो की अनोळखी व्यासपीठावरून जाताना आणि परतताना टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देणारा सभागृहातील रसिकश्रोताच होता. निकालाची वाट बघताना या सर्व स्पर्धकांचा गप्पांचा फड देखील रंगला होता. विशेष म्हणजे, या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन ऑईलचे वितरक डॉ. नीळकंठ यावलकर खास आले होते. तर मागील वर्षी उपस्थिती दर्शवणाऱ्या सरिता देशमुख देखील मुलांना प्रोत्साहित करत होत्या. निर्भीड लेखणीच्या वृत्तपत्रातून अशा उच्च दर्जाच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते, ही विद्यार्थ्यांसाठी जमेची बाजू असल्याचे प्रतिपादन डॉ. पिनाक दंदे यांनी यावेळी केले.

कस लावणारी स्पर्धा

वक्तृत्व स्पर्धेसाठी वाणी आणि शब्द या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शब्द पाठ करून स्पर्धा जिंकता येत नाहीत. त्यासाठी चिंतन, मनन आवश्यक असल्याचा सल्ला परीक्षक प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना दिला. वर्तमानातील ज्वलंत विषय स्पर्धेत असल्याने स्पर्धा कस लावणारी होती. कला आणि सादरीकरणासोबतच दृष्टिकोन देखील महत्त्वाचा असल्याचे प्रा. मुनघाटे यांनी सांगितले.

प्रायोजक

पितांबरी कंठवटी प्रस्तुत, लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एंटरटेन्मेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vaktrutva spardha 2019 final round in nagpur

ताज्या बातम्या