वर्धा केंद्रीय ग्रुह मंत्रालयाने राष्ट्र गीत गायनाची नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा येथील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रम यात ‘ वंदे मातरम ‘ हे राष्ट्रीय गीत गायिल्या जाणे अनिवार्य ठरले आहे. ३ मिनिटे १० सेकंदाच्या या राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे रहावे लागणार आहे.
या गीताची संपूर्ण सहा कडवी गायल्या जाणार असून त्यात श्रीदुर्गा देवीचा उल्लेख पण असणार आहे. यापूर्वी केवळ दोन कडवी गायली जात होती. त्यासाठी फक्त ६० सेकंद लागत असे.बंकीमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी वंदे मातरम या गीताची रचना केली होती. हे गीत संस्कृत – बंगाली या दोन भाषेत मिश्रित आहे. हे गीत प्रथम त्यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीत छापल्या गेले. सदर गीत भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक शक्तिशाली नारा म्हणून उदयास आले.
मातृभूमीप्रति समर्पण व ब्रिटिश सत्तेविरोधात रोष म्हणून मान्य पावले. १८९६ साली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम सादर केले होते. १९०५ साली झालेल्या बंगाल विभाजनाच्या विरोधात हा एक महत्वाचा नारा ठरला. त्यानंतर त्यास राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.आता हेच वंदे मातरम गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करणे यापूर्वीही गीत वाजविल्या जाणार.
राष्ट्रगीत म्हणजे जन गण मन आणि राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम एकत्र वाजवायचे असल्यास आधी वंदे मातरम आणि नंतर जण गण मन म्हटल्या जाणार. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि घटनात्मक संस्था यांना या बाबतचे निर्देश प्रसारित करण्यात आले आहे.वंदे मातरम याचा अर्थ असा आहे. हे माते मी तुज वंदन करीत आहे.
या ठिकाणी माता म्हणजे भारत माता, आमची मातृभूमी जी नद्या व संस्कृतीचे प्रतीक आहे. देशाप्रती गाढ सन्मान अतूट प्रेम याचे हे प्रतीक. राष्ट्रगीत म्हणून जण गण मन हे गायल्या जात असते. मात्र वंदे मातरम हे आजवर सांस्कृतिक व देशभक्तीपर समारंभात गायल्या जात असे. आता ते गीत पण अशा सर्व समारंभात गाणे अनिवार्य करण्यात आले आहे.

