गडचिरोली :  एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस ; देशभरात सर्वत्र साजरा होणार

dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

एटापल्ली तालुक्यात मागील काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावर सुरू आलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी उभे असलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यात १ जेसीबी,१ पोकलॅन आणि १ मिक्सरमशीनचा समावेश आहे. यावेळी १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातील विसामुंडी मार्गावर देखील एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.