Actor Dharmendra Passes Away : ‘कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा’ असे डायलॉग आपल्या धारदार आवाजात फेकणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धमेंद्र उर्फ धरम पाजी यांनी विदर्भात वाघ बघण्यासाठी येण्याची इच्छा २०११ मध्ये एका माध्यमाशी बोलतांना वर्तवली होती. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन हे पेंचमध्ये वाघ आणि जंगल बघून गेल्यावर त्यांच्याशी याबाबत बोलल्याचाही संदर्भ दिला होता. परंतु धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे.

एका वृत्तपत्राने २०१० ते २०११ दरम्यान वाघांबाबत विशेष कॅम्पेनिंग केले होते. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांची मुलाखत घेतली होती. त्यात धर्मेंद्र यांनी निसर्गाची विशालता, त्याचे अदम्य सौंदर्य आणि त्याच्या असंख्य रंगछटांनी नेहमीच माझ्या मनावर अमिट छाप सोडली. हे सर्व हिरवळ नागपूरच्या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांच्या स्वरूपात जिवंत असल्याचा आनंद असल्याचे कळल्याचे सांगितले होते. दरम्यान नागपूरसह विदर्भात मोठ्या संख्येने वाघांचे घर आहे. त्यामुळे नागपूरला जागतिक व्याघ्र राजधानी बनवले पाहिजे, अशी इच्छाही धर्मेंद्र यांनी वर्तवली होती. माझ्या मते, वाघ हे जंगलातील सर्वात सुंदर प्राणी आहेत आणि त्यांचे जतन केले पाहिजे, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान नागपूर आणि त्याच्या काही सुंदर जंगलांशी असलेल्या जवळीकतेबद्दल लोकांना सांगणे गरजेचे आहे. खरं तर, मी देखील लवकरच या भागात सहलीला जाण्याचा विचार करत आहे. अमिताभ अलिकडेच पेंचमध्ये होते आणि मी तेव्हा त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनीही मला येथील जंगलाच्या सौंदर्याबद्दल सांगितले. मी नुकतेच जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात गेलो होतो आणि मला वाटते की मी लवकरच नागपूरला भेट देण्याची योजना आखेल, असेही वर्ष २०११ मध्ये धर्मेंद्र म्हणाले होते. परंतु ते जंगलात येऊ शकले नसल्याने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिल्याचे वन्य प्रेमींनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.

धर्मेंद्र म्हणाले… जंगल तुम्हाला ताजेतनावे, पुनरूज्जीवित करते

धर्मेंद्र एका वृत्तापत्राला २०११ मंध्ये मुलाखत देतांना म्हणाले होते. मला जंगलाला भेट द्यायला आवडते, कारण ते एक असे ठिकाण आहे जे तुम्हाला पूर्णपणे ताजेतवाने आणि पुनरुज्जीवित करते. नागपूर केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनू शकते. वाघांना वाचवण्याबद्दल जागरूकता देखील वाढेल हे सांगायला नको, असेही धर्मेंद्र म्हणाले होते.