रॅगिंगची अख्खी चित्रफीतच समोर

महेश बोकडे

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नागपूर: मेडिकलमधील रॅगिंग प्रकरणात पीडित विद्यार्थ्याला गच्चीवर उभे करण्यात आले, शिवीगाळ, मारहाणही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याबाबतची चित्रफीत राष्ट्रीय रॅगिंग समितीने मेडिकलला पाठवल्यावर येथील सहा आंतरवासिता विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करून त्यांना वसतिगृहातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. परंतु चौकशीत ही चित्रफीत सुमारे सहा महिन्यांपूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेडिकलच्या रॅगिंग विरोधी समितीने मंगळवारी केलेल्या चौकशीत ही चित्रफीत वसतिगृह क्रमांक ५ मधील असल्याचे स्पष्ट झाले. सहा आंतरवासिता विद्यार्थ्यांनी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याला या वसतिगृहातील गच्चीवर उभे केले. येथे विद्यार्थ्याला मारहाण केली. त्याला शिवीगाळही झाली. कुणीतरी ही चित्रफीत काढली. कालांतराने या सहा विद्यार्थ्यांसोबत त्याचे पटत नसल्याने त्यानेच याबाबत तक्रार केल्याचा अंदाज मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> नागपूर: कारागृहात ‘राडा’, कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी

दिल्लीतील राष्ट्रीय रॅगिंग विरोधी समितीकडे तक्रार केल्यावर त्यांनी तातडीने मेडिकलला ई-मेलवर चित्रफीत पाठवून कारवाईची सूचना केली. त्यावरून मेडिकल प्रशासनाने सहाही विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करून वसतिगृहातूनही हकालपट्टी केली. सोबत अजनी पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे विनंती करणारे पत्रही दिले. या घटनेची गांभिर्याने दखल घेत बुधवारी वैद्यकीय शिक्षण खात्यानेही मेडिकल प्रशासनाकडून तातडीने या घटनेचा अहवाल मागवून घेतला.

हेही वाचा >>> नागपूर: कारागृह पोलिसांचा ‘साइड बिझनेस’; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर १०० रुपये प्रतिमिनिट कॉलसाठी…

पीडित म्हणतो, ही तर वाढदिवसाची पार्टी

मेडिकलमध्ये रॅगिंग प्रकरण पेटले असतानाच चित्रफीतमध्ये रॅगिंग होत असलेल्या विद्यार्थ्याने मात्र ही रॅगिंग नव्हे तर एका वरिष्ठ सहकाऱ्याच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान सुरू असलेली गंमत असल्याचे पत्र प्रशासनाला दिले. रॅगिंग विरोधी समितीने मात्र या प्रकरणात सबळ पुरावा असल्याने तडकाफडकी सहाही विद्यार्थ्यांवर कारवाई केली. अशा कारवाईचा समितीला अधिकार असल्याचाही दावा केला.

हेही वाचा >>> नागपूर: तुमच्याही संसारात सासू हस्तक्षेप करते का? मग, वाचाच…

चार तासांत कारवाई

मेडिकल प्रशासनाला दिल्लीतील समितीने सोमवारी संध्याकाळनंतर संबंधितांवर कारवाईची सूचना केली. त्याबाबतचा ई-मेल मेडिकल प्रशासनाने मंगळवारी दुपारी १२ वाजता बघितला. त्यानंतर तडकाफडकी बैठकींचे सत्र घेत चार तासात कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सहाही दोषी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले गेले. ही मेडिकलच्या इतिहासातील रॅगिंग प्रकरणातील सगळ्यात वेगवान कारवाई आहे.

अद्याप अहवाल नाही

“सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पत्रासोबत आवश्यक अहवाल नव्हता. त्याबाबत मेडिकल प्रशासनाला एक अधिकारी नियुक्तीची सूचना केली आहे. उद्या ही प्रक्रिया करण्याचे मेडिकलने कळवले आहे. ही तक्रार आल्यावर नियमानुसार कारवाई होईल, अशी माहिती अजनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण नितीन फटांगळे यांनी दिली.

“विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा प्रकार प्रशासन खपवून घेणार नाही. या प्रकरणात सहा विद्यार्थ्यांवर चार तासांतच कारवाई केली गेली. पुढे असा प्रकार होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जाईल.”

– डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल.