भंडारा : भारताच्या संविधानातील कलम ३ प्रमाणे विदर्भ राज्य निर्माण करणे हा केंद्र सरकारचा व संसदेचा अधिकार आहे. राज्य सरकारने कितीही कोल्हेकुई केली तरी काहीही उपयोग नाही व “विदर्भाचे राज्य आम्ही मिळवून घेऊच” अशी हुंकार विदर्भ आंदोलन समितीने भंडारा येथे आयोजित मेळाव्यात भरली.
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हयामध्ये गावा-गावात आंदोलनाची धग वाढविण्याकरीता प्रभावी प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने बालाजी लॉन, साई मंदिराच्या बाजूला, भंडारा येथे दि. ७ जून २०२५ ला पूर्व विदर्भाचा ” विदर्भ राज्य निर्माण मेळावा ” आयोजित करण्यात आला. या तीन जिल्ह्याच्या मेळाव्याला गोंदिया जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्याचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप बोलताना म्हणाले की, १९९७ साली भाजपने भुवनेश्वरला राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये विदर्भाचा ठराव केला. लगेच अटलजींनी छत्तीसगड, उत्तरांचल व झारखंड ही तीन नवी राज्य निर्माण केली. परंतु तेव्हा केंद्रात शिवसेना सत्तेत असल्यामुळे त्यांच्या धाकाने अटलजींनी विदर्भ दिला नाही. २०१४ च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपाने विदर्भातील जनतेला विदर्भाच्या नावाने मते मागीतली व विदर्भातील जनतेने त्यांचेवर विश्वास ठेवून भाजपाचे ४४ आमदार निवडून दिले. पुन्हा राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले व पुन्हा शिवसेनेच्या विरोधामुळे केंद्राने विदर्भ दिला नाही.
दोन्ही वेळेस भाजपाने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला म्हणून २०१९ मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समीतीने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे व जनजागृतीमुळे विदर्भातुन भाजपाचे १५ आमदार कमी झाले व आतातर विदर्भातील ३ एम.एल.सी. ही विदर्भातून कमी झाले. भाजपा व शिवसेनेची सोडचिठ्ठी झाल्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून ॲड. वामनराव चटप (विराआंस अध्यक्ष, पूर्व आमदार), उद्घाटक म्हणून प्रकाश पोहरे (किसान ब्रिगेड प्रमुख) मंचावर उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रंजना मामर्डे (महिला आघाडी अध्यक्ष), पहिल्या सत्राचे अध्यक्ष एड. नीरज खांदेवाले होते, प्रा. प्रभाकर कोडबत्तूनवार (को.क.स.), पूर्व राज्यमंत्री रमेश गजबे, मुकेश मासूरकर , सुरेश वानखेडे (उपाध्यक्ष विराआंस), तात्यासाहेब मते, अहमद कादर, (नाग विदर्भ समिति प्रमुख), नासीर जुम्मन शेख मंचावर होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक संजय केवट यांनी सादर केले, संचालन अतुल सतदेवे तर आभार वसंत गवळी यांनी मानले. स्वतंत्र विदर्भ राज्य मेळाव्याच्या यशस्वीते करिता विदर्भ राज्य आंदोलन समितिचे गोंदिया भंडारा जिल्हा विभाग प्रमुख संजय केवट, विजय नवखरे ( भंडारा जिल्हा अध्यक्ष), राजेंद्र सिंह ठाकुर (गडचिरोली जिल्हा अध्यक्ष), गोंदिया जिल्ह्यातून अतुल सतदेवे (गोंदिया जिल्हा समन्वयक) , अध्यक्ष वसंत गवळी, उपाध्यक्ष भोजराज ठाकरे, महासचिव सी.पी. बिसेन, कोर कमेटी सदस्य छैलबिहारी अग्रवाल, सुंदरलाल लिल्हारे, महिला आघाडीच्या पंचशीला पानतावणे, दीपा काशीवार, प्रशांत नखाते, नरेश निमजे, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, घिसू खुणे पाटील, वजीर बिसेन, भूपेंद्र पटले, रमेश बिसेन, बंडू वैद्य , अरुण बन्नाटे, यशवंत रामटेके, ज्ञानेन्द्र आगाशे, भगवान झंझाड, एड. पी एन. टेंभुर्णीकर , आय. एच. मेश्राम, सौरभ भंडारकर, भाऊराव बनसोड, रामचंद्र रोकडे, नेपाल मारगाये, दुर्वास धार्मिक, संजय नवखरे, परमेश वळके, किशोर सोनवाने, प्रमोद जिभकाटे, दुर्योधन वैद्य, अमित हुमणे, दीपाली सेलूकर, डॉ.नीरज खोब्रागडे यांनी प्रयत्न केले.