scorecardresearch

Premium

बाह्ययंत्रणेमार्फत शिक्षक भरतीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध; सरकारने पुनर्विचार करावा : आमदार अडबाले

राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Vidarbha Madhyamik Teachers Association
बाह्ययंत्रणेमार्फत शिक्षक भरतीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध; सरकारने पुनर्विचार करावा : आमदार अडबाले (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

चंद्रपूर : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागांतील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. शिक्षकांना स्थिरता मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. प्रशासकीय खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी शक्य तिथे बाह्ययंत्रणेद्वारे काम करून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्यांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय ६ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केला.

inter state racket
यवतमाळ : ‘नीट’ परीक्षेत डमी उमेदवार बसविणारे आंतरराज्यीय रॅकेट, नांदेडपासून दिल्लीपर्यंत सूत्रधार
primary teachers union march Jalgaon
अशैक्षणिक कामांबाबत शिक्षक आक्रमक, जळगावात प्राथमिक शिक्षक संघाचा मोर्चा
MPSC
‘एमपीएससी’चा कारभार सुधरेना, आता तांत्रिक अडचणींमुळे शेकडो उमेदवार अर्जास मुकणार!
teachers day celebration in india
सरकार दरबारी शिक्षक ‘अकुशल’; बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त शिक्षकांना दर्जापेक्षा कमी वेतन

हेही वाचा – गडचिरोली : “हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारा”, भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन

हेही वाचा – वाशीम जिल्ह्यात पावसाचे आगमन, कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; बळीराजा सुखावला

आमदार अडबाले यांनी सरकारला आवाहन केले की, शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. शिक्षकांना कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी. शिक्षकांची बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. शिक्षकांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. आमदार अडबाले यांनी सरकारला या शासन निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vidarbha madhyamik teachers association opposes recruitment of teachers through external system rsj 74 ssb

First published on: 21-09-2023 at 15:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×