नागपूर : मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा मात्र अजूनही कायम आहेत. त्यातच आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मे पर्यंत पावसाचा तडाखा बसेल.
महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई,
हेही वाचा – नागपूर : ब्रेकअपनंतर प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; प्रियकरावर गुन्हा दाखल
सध्या मान्सूनची वाटचाल सकारात्मक मार्गाने सुरू असून कोणताही अडथळा न आल्यास बंगालच्या उपसागरातून तो वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. एकीकडे हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.