scorecardresearch

Premium

विदर्भाने झारखंडचा धुव्वा उडवला, विजय हजारे ट्रॉफीमध्ये १० गडी राखून विजय

जयपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भ संघाने झारखंडचा एकतर्फी धुव्वा उडवित १० गडी राखून विजय प्राप्त केला.

Vidarbha win by 10 wickets against Jharkhand
विदर्भाचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : विजय हजारे ट्रॉफीत विदर्भाने सलग चौथा विजय प्राप्त केला आहे. बुधवारी जयपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भ संघाने झारखंडचा एकतर्फी धुव्वा उडवित १० गडी राखून विजय प्राप्त केला. झारखंड संघाला १०७ धावांवर रोखून केवळ १३.४ षटकात विदर्भाने लक्ष्याची प्राप्ती केली.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास
On the strength of Olly Pope's century England scored 311 runs in the second innings
IND vs ENG 1st Test : ऑली पोपच्या शतकाने इंग्लंडचे सामन्यात दमदार पुनरागमन, दुसऱ्या डावात घेतली १२६ धावांची आघाडी
IND vs ENG 1st Test Updates in marathi
IND vs ENG 1st Test : जसप्रीत बुमराहने रोहित शर्माची चूक सुधारताच केले जबरदस्त सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल

विदर्भाने नाणेफेक जिंकून झारखंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विदर्भाकडून यश ठाकूरने २७ धावा देत ३ गडी बाद केले. अक्षय कर्णेवार आणि दर्शन नळकांडे यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. झारखंडचे केवळ चार फलंदाज दुहेरी धावसंख्यापर्यंत मजल मारू शकले. झारखंड संघाला ३३ षटकात रोखल्यावर विदर्भाच्या सलामीवीर फलंदाजांनी सहजपणे लक्ष्य प्राप्त केले. अथर्व तायडेने ७० धावा केल्या. त्याला अक्षय वाडकरने ३३ धावा काढत सहाय्य केले.

आणखी वाचा-बहुतांश मागण्या मान्य, उर्वरित मांगण्याची महिन्याभरात पूर्तता; रविकांत तुपकरांचे ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलन मागे

विदर्भाचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. यापूर्वी मेघालय, मणिपूर आणि महाराष्ट्र संघाला पराभूत करून विदर्भ संघाने १६ गुणांसह स्पर्धेत पहिले स्थान कायम राखले आहे. दुसऱ्या स्थानावर १२ गुणांसह सर्व्हिस क्रिकेट संघ आहे. विदर्भाचा पुढील सामना १ डिसेंबरला तिसऱ्या स्थानावर असलेल्या छत्तीसगड संघाविरुद्ध खेळला जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vidarbha win by 10 wickets against jharkhand in vijay hazare trophy tpd 96 mrj

First published on: 29-11-2023 at 22:34 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×