पोलीस ठाण्यात चक्क पोलीसच खेळतात जुगार!, चित्रफीत सार्वत्रिक झाल्यामुळे खळबळ |video of police playing gambling in rajura police station in chandrapur district has gone viral | Loksatta

पोलीस ठाण्यात चक्क पोलिसच खेळतात जुगार!; व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

कायद्याचे संरक्षण करणारे पोलीसच जर ठाण्यात जुगार खेळत कायदा मोडत असतील तर कायद्याच्या संरक्षणासाठी नागरिकांनी जायचे कुठे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पोलीस ठाण्यात चक्क पोलिसच खेळतात जुगार!; व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ
पोलीस ठाण्यात चक्क पोलीसच खेळतात जुगार!; व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी चक्क जुगार खेळतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कायद्याचे संरक्षण करणारे पोलीसच जर ठाण्यात जुगार खेळत कायदा मोडत असतील तर कायद्याच्या संरक्षणासाठी नागरिकांनी जायचे कुठे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा: भंडारा : लग्न समारंभात अन्नातून २०० जणांना विषबाधा

दोन महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूर हे सेवानिवृत्त झाल्यापासून राजुरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची खुर्ची रिकामी होती. त्याचा प्रभारी कारभार हा सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्याकडे सोपवण्यात आला. अशातच राजुरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. पोलीस ठाण्यामध्येच जुगार खेळण्याचे धाडस करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सहायक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्या देखील निलंबनाची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरगे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी यांना निवेदनातून केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 09:20 IST
Next Story
कारागृहांत क्षमतेपेक्षा ३० टक्के जास्त कैदी ; न्यायालयीन दिरंगाईही कारणीभूत